ITI Admission : पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर प्रवेशाला मुकाल! सविस्तर वेळापत्रक जाहीर

आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करताना विद्यार्थ्यांना पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ एकच अर्ज भरता येणार आहे.

ITI Admission : पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर प्रवेशाला मुकाल! सविस्तर वेळापत्रक जाहीर
ITI Admission Process 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी (ITI Admission) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (DVET) सविस्तर वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आजपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश (Online Admission) अर्ज भरता येणार आहेत. या प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी व खासगी संस्थास्तरीय फेरी अशा एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. (Maharashtra ITI Admission Process 2023)

आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करताना विद्यार्थ्यांना पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ एकच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज रद्द करून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जाचे निश्चितीकरण करणे आवश्यक आहे. त्याच अर्जांचाच प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून

विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीमध्ये एक ते शंभर पसंतीक्रम देता येणार आहेत. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमानुसार संस्था मिळाल्यास त्या संस्थेतच प्रवेश घ्यावा लागेल. अन्यथा चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तर दुसऱ्या फेरीत पसंतीक्रम एक ते तीनपैकी कोणताही एक, तिसऱ्या फेरीत पहिल्या पाच पसंतीक्रमांपैकी कोणताही एक आणि चौथ्या फेरीत कोणत्याही एका पसंतीक्रमानुसार संस्था मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये संस्था न मिळाल्यास पसंतीक्रमात बदल करता येणार आहे, अन्यथा जुन्या पसंतीक्रमानुसारच निवड यादी प्रसिध्द केली जाईल. समुपदेशन फेरीसाठी पात्र तसेच नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार असल्याचे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी संकेतस्थळhttps://admission.dvet.gov.in

  

आयटीआय प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे – दि. १२ जून ते ११ जुलै

अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे – दि. १९ जून ते ११ जुलै

पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे – १९ जून ते १२ जुलै

प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – १३ जुलै (स. ११ वाजता)

गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे – १३ व १४ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – १६ जुलै

पहिली प्रवेश फेरी

पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे – २० जुलै (सायं. ५ वाजेपर्यंत)

निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेश घेणे – २१ ते २५ जुलै

ITI Admission : ‘आयटीआय’ प्रवेशाची प्रतिक्षा संपली! सोमवारपासून भरा अर्ज

दुसरी प्रवेश फेरी

दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे – २१ ते २५ जुलै

संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी प्रसिध्द करणे – ३१ जुलै (सायं. ५ वाजेपर्यंत)

निवड झालेल्या संस्थेत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेश घेणे – १ ते ४ ऑगस्ट

तिसरी प्रवेश फेरी

तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे – १ ते ४ ऑगस्ट

संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी प्रसिध्द करणे – ९ ऑगस्ट (सायं. ५ वाजेपर्यंत)

निवड झालेल्या संस्थेत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहू प्रवेश घेणे – १० ते १४ ऑगस्ट

चौथी प्रवेश फेरी

चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे – १० ते १४ ऑगस्ट

संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी प्रसिध्द करणे – २० ऑगस्ट (सायं. ५ वाजेपर्यंत)

निवड झालेल्या संस्थेत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेश घेणे – २१ ते २४ ऑगस्ट

नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे – १७ जुलै ते २४ ऑगस्ट

NEET ची तयारी करायचीय, पण कोचिंगसाठी पैसे नाहीत? मग या क्लासमध्येच प्रवेश घ्या

संस्थास्तरीय समुपदेशन फेरी

गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – २६ ऑगस्ट

रिक्त जागांनुसार संस्थेत समुपदेशन फेरीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे – २७ व २८ ऑगस्ट

संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे व फेरीसाठी वेळ व दिनांक देणे – २९ ऑगस्ट

दिलेली वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनासाठी बोलावणे व जागांचे वाटप करणे – ३० व ३१ ऑगस्ट

जागा वाटपानुसार संबंधित संस्थेत प्रवेश निश्चित करणे – ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर

खाजगी संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश

रिक्त जागा संबंधित खाजगी संस्थांना संस्थास्तरावर भरण्यासाठी उपलब्ध करून देणे – २१ जुलै ते प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यत

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo