NEET ची तयारी करायचीय, पण कोचिंगसाठी पैसे नाहीत? मग या क्लासमध्येच प्रवेश घ्या

NEET साठीची तयारी करू इच्छिणाऱ्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसाठी पुणे येथे गेली साडे सात वर्षांपासून ही संस्था काम करत आहे.

NEET ची तयारी करायचीय, पण कोचिंगसाठी पैसे नाहीत? मग या क्लासमध्येच प्रवेश घ्या
Lift For Upliftment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी (MBBS Admission) बंधनकारक असलेल्या NEET (राष्ट्रीय पात्रता तथा पूर्व प्रवेश परीक्षा) परीक्षेच्या तयारीसाठ राज्यात अनेक कोचिंग क्लासेस (Coaching Classes) आहेत. पण त्यांच्याकडून आकारले जाणारे शुल्कही भरमसाठ असते. अनेक गरजू, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (Students) अशा क्लासमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतेकवेळा ते स्पर्धेत मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे.

NEET साठीची तयारी करू इच्छिणाऱ्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसाठी पुणे येथे गेली साडे सात वर्षांपासून ही संस्था काम करत आहे. संस्थेमार्फत पूर्णपणे विनामूल्य कोचिंग क्लासेस घेतले जातात. या क्लासेसमध्ये बी. जे. मेडिकल कॉलेजसह विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील MBBS चे विद्यार्थीच मार्गदर्शन करतात. हा एक सामाजिक उपक्रम असून तो केवळ गरीब, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

NEET 2023 : ‘त्या’ ३८ महाविद्यालयांमध्ये ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळणार का? विद्यार्थी, पालक संभ्रमात

दोन वर्षाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकासासोबत शारीरिक आणि मानसिक विकास करण्याच्या उद्देशावरही संस्थेमार्फत भर दिला जातो. याचाच एक यशस्वी परिणाम म्हणजे एम.बी.बी.एस. ला ५० विद्यार्थी, बी.डी.एस. ला १६, बी.ए.एम.एस. ला ४० आणि बी.एच.एम.एस. ला १४ विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.

यावर्षीही NEET ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. नविन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रीयेचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम १५ जून आहे. हा प्रवेश फक्त दहावी उत्तीर्ण गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ जून

वर्ग प्रारंभ - १ ऑगस्ट २०२३ पासून

संपर्क - ७७२००३३००७

अधिक माहितीसाठी भेट द्या - www.lfupune.in/

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo