विद्यापीठात गणेशोत्सव साजरा करण्यावरून भाजप आमदाराची थेट कुलगुरूंना धमकी

कुलपती सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात प्राध्यापक अमीन यांनी गणेश चतुर्थी उत्सवाबाबत भाजप आमदाराकडून येणाऱ्या धमक्या आणि दबावाबाबत नमूद केले आहे. 

विद्यापीठात गणेशोत्सव साजरा करण्यावरून भाजप आमदाराची थेट कुलगुरूंना धमकी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरात गणेशोत्सवाची (Ganesh Festival) तयारी सुरु असताना मंगळूर येथील मंगलौर विद्यापीठात गणेश चतुर्थीवरून वाद निर्माण झाला आहे.  मंगलोर विद्यापीठाचे (Mangalore University) कुलगुरू प्रा. जयराज अमीन (Prof. Jayraj Amin) यांनी आरोप केला आहे की, भाजप आमदार वेदव्यास कामत (BJP MLA Vedavyasa Kamath) यांनी विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसच्या मंगला सभागृहात गणेश चतुर्थी उत्सव आयोजित करण्यासाठी धमकावले आहे.

 

कुलपती सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात प्राध्यापक अमीन यांनी गणेश चतुर्थी उत्सवाबाबत भाजप आमदाराकडून येणाऱ्या धमक्या आणि दबावाबाबत नमूद केले आहे. प्रा. जयराज अमीन यांनी केलेल्या केलेल्या तक्रारीनुसार, १ सप्टेंबर रोजी आमदार वेदव्यास कामत हे भाजप नेते संतोष कुमार बोलियार, माजी सिंडिकेट सदस्य रमेश के आणि इतर आठ जणांसह त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी कुलगुरू प्राध्यापकांना गणेश चतुर्थीचा कार्यक्रम मंगला हॉलमध्ये विद्यापीठाच्या खर्चाने आयोजित करण्यास सांगितले. तसे न केल्यास आंदोलन करू अशी धमकी कामत  यांनी दिली आहे. 

शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी कामाला लावणार! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

 

कुलगुरूंच्या आरोपानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगले आहे.  कामत यांनी काँग्रेस सरकार आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुलगुरूंना विद्यापीठात कोणताही धार्मिक सण साजरा करू नये, अशा सूचना केल्याचा आरोप कामत यांनी  केला आहे. दरम्यान विद्यापीठाच्या मंगल गंगोत्री संकुलात अनेक वर्षांपासून गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जात होता. 

 

कोरोना महामारीत  प्रोटोकॉलमुळे गणेश चतुर्थीचा कार्यक्रम सभागृहात हलवण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये, सिंडिकेटने गणेश चतुर्थीचा कार्यक्रम  मंगला सभागृहात एकत्रित कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विद्यापीठाने १ लाख ५२ हजार ९०१ रुपयांची तरतूद केली होती.  त्यावर ऑडिट दरम्यान आक्षेप घेण्यात आला. यानंतर, ३० जून  रोजी विद्यापीठाचे ऑडिट  घेण्यात आले.  ज्यामध्ये कार्यालयीन नियमावली आणि कर्नाटक विद्यापीठ कायद्याच्या नियमांचे पालन करण्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर हा वाद सुरु झाला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j