इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याची शेवटची संधी; बोर्डाने दिली मुदतवाढ

विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून २९ मे ते ९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. तर विलंब शुल्कासह १० जून ते १४ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील.

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याची शेवटची संधी; बोर्डाने दिली मुदतवाढ
HSC Supplementary Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC Board) जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या (HSC Result) पुरवणी परीक्षेसाठी (Supplementary Examination) अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपली असून विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. (Maharashtra HSC Exam)

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

ITI Admission : पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर प्रवेशाला मुकाल! सविस्तर वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून २९ मे ते ९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. तर विलंब शुल्कासह १० जून ते १४ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. ही मुदत मंडळाकडून वाढविण्यात आली असून त्यानुसार विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १८ जूनपर्यंत अर्ज भरता येतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी दिली.

दरम्यान, ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज भरा या संकेतस्थळावर : www.mahahsscboard.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo