संस्कृती स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांची कमाल; पंतप्रधान कार्यालयाकडून संशोधनाची दखल

दिल्लीतील प्रदर्शनामध्ये हे उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी शशांक शिवानंदन, चिरंत मूर्ती आणि शाल्मली कुलकर्णी यांना मिळाली आहे.

संस्कृती स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांची कमाल; पंतप्रधान कार्यालयाकडून संशोधनाची दखल
Sanskriti School students

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील संस्कृती स्कूलमधील (Sanskriti School) तीन विद्यार्थ्यांना भारत राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून (Prime Minister Office) आमंत्रण आले आहे. विद्यार्थ्यांनी (Students) केवळ दहा महिन्यात नाविन्यपूर्ण उत्पादन 'पशुपाल' ची निर्मिती केली आहे. दिल्लीतील प्रदर्शनामध्ये हे उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी शशांक शिवानंदन (Shashank Shivanandan), चिरंत मूर्ती (Chirant Murthy) आणि शाल्मली कुलकर्णी (Shalmali Kulkarni) यांना मिळाली आहे.

देशभरातून प्रदर्शनासाठी अटल टिंकेरींग लॅब, नीती आयोगाचे ४० नावीन्यपूर्ण शालेय प्रकल्पांची पंतप्रधान कार्यालयातून निवड करण्यात आले. स्वाती हरिप ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी आणि अकरावी मधील या तीन विद्यार्थ्यानी विकसित केलेले हे साधन गायी, म्हशी तसेच विविध जनावरांच्या स्वच्छतेसाठी आणि मालिश करण्यासाठी वापरता येते. हे साधन विजेशिवाय चालते आणि ६० टक्के पाण्याची बचत होते.

हेही वाचा : NCL मध्ये भरणार संशोधन उत्सव; विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा पाहण्याची संधी

शहरातील जीवनशैली अनुभवत असून सुद्धा विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनशैली सुकर होण्यासाठी अतिशय उपयुक्त साधनाची निर्मिती केली आहे. ३D प्रिंटिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी ह्या साधनांची निर्मिती केली. नीती आयोगाच्या अटल टिंकेरींग लॅबच्या अनुदानातून मिळालेल्या सुविधांचा शालेय जीवनात योग्य वापर करून सर्जनशीलता आणि नवीनतेची बीजे रुजवण्यामध्ये नक्कीच उपयोग होताना दिसून येत आहे.

दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये ११ ते १४ मे या कालावधीमध्ये  देशभरातील नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदर्शित केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या प्रदर्शनाचे उदघाटन केले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ‘स्कूल टू स्टार्टअप’ या कार्यक्रमाच्या थीमचेही पंतप्राधन मोदी यांनी कौतूक केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2