CUET PG 2024 परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध 

23 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

CUET PG 2024 परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 23 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (CUET PG) प्रवेशपत्र जारी केले आहे. CUET PG परीक्षेत बसलेले उमेदवार pgcuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUET PG परीक्षा 11 ते 28 मार्च दरम्यान देशातील विविध राज्य आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये आयोजित केल्या जात आहेत.त्यातील 23 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून त्यांचे CUET PG प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

अधिकृत सूचनेनुसार, NTA CUET PG 2024 प्रवेशपत्र पोस्टल सेवेद्वारे पाठवले जाणार नाही. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील कोणत्याही माहितीमध्ये छेडछाड किंवा बदल करू नये. तथापि, प्रवेशपत्र जारी केल्याने पात्रतेची पुष्टी होत नाही, कारण पुढील मूल्यमापन प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात केले जाईल. त्यामुळे, उमेदवारांनी त्यांच्या CUET PG प्रवेशपत्राची प्रत भविष्यातील संदर्भासाठी ठेवावी, अशी सूचना NTA कडून देण्यात आली आहे. 

  असे करा  PG प्रवेशपत्र डाउनलोड 
* सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम CUET PG च्या अधिकृत वेबसाइट pgcuet.samarth.ac.in ला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या CUET PG प्रवेशपत्र 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
* एक नवीन विंडो उघडेल, लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.
* त्यानंतर स्क्रीनवर CUET PG ॲडमिट कार्ड 2024 दिसेल.
* प्रवेशपत्र डाउनलोड करा  प्रिंटआउट घ्या.

CUET PG ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना उमेदवारांना काही समस्या आल्यास किंवा ॲडमिट कार्डवर दिलेल्या माहितीमध्ये काही तफावत आढळल्यास, त्यांनी NTA हेल्प डेस्कशी 011-40759000 वर संपर्क साधावा किंवा NTA cuetpg@nta.ac येथे ईमेल पाठवावा.