NEET PG 2024 परीक्षेची तारीख पुन्हा बदलली ; आता केव्हा होणार परीक्षा..

या आधीही या परीक्षेची तारीख बदलून  ७ जुलै रोजी करण्यात आली होती.

NEET PG 2024 परीक्षेची तारीख पुन्हा बदलली ; आता केव्हा होणार परीक्षा..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET PG 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन माहिती समोर आली आहे. NEET PG (NEET PG 2024 परीक्षा) ची पूर्वी जाहीर केलेली तारीख,  पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) बुधवारी 20 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या  प्रसिद्धी पत्रकानुसार  NEET PG 2024 आता 23 जून रोजी घेण्यात येईल. या आधीही या परीक्षेची तारीख बदलून  (change of exam date) येत्या ७ जुलै रोजी करण्यात आली होती.

दरम्यान, NMC च्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाने (PGMEB) NEET PG 2024 परीक्षा आयोजित केल्यानंतर निकाल जाहीर करण्याच्या पूर्वी जाहीर केलेल्या तारखेमध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही. आयोगाच्या सूचनेनुसार  निकाल 15 जुलै 2024 पर्यंत जाहीर केले जातील. यानंतर यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी 5 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या कालावधीत समुपदेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर  शैक्षणिक सत्र 16 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि प्रवेशित विद्यार्थ्यांना 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागेल.

याशिवाय, PGMEB ने NEET PG 2024 मध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या बॅचलर डिग्रीनंतर अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करण्याची कट-ऑफ तारीख देखील जाहीर केली आहे. नोटीसनुसार, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची इंटर्नशिप १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे.