पोलीस भरती शिपाई पदांच्या लेखी परीक्षेची अपेक्षित तारीख जाहीर

मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा उमेदवारांची पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या ७ जुलै व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या १४ जुलै रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे.

पोलीस भरती शिपाई पदांच्या लेखी परीक्षेची अपेक्षित तारीख जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अपर पोलीस महासंचालक (Additional Director General of Police) यांच्या अध्यक्षेतेखाली मंगळवार दि. २५ जून रोजी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे बैठक (Video conference meeting) घेण्यात आली असून ज्या उमेदवारांची  मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा उमेदवारांची पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या ७ जुलै व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या १४ जुलै (Police constable written exam dt. July 7 and driver police constable written exam dt. 14 July) रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याप्रमाणे तयारी करण्याच्या सूचना अपर पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने रेंगाळलेल्या पोलिस भरतीच्या प्रक्रियेला आता वेग येताना दिसत आहे. मैदानी चाचणी संपल्याबरोबर लेखी परीक्षा घेण्याची तयारी गृह विभागाने दाखवली आहे. लेखी परीक्षेच्या दृष्टीकोनातुन पुर्वतयारी, सुचना व निर्देशांकरता अपर पोलीस महासंचालक यांच्याकडून २५ जून रोजी दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी बैठकीत लेखी परीक्षेच्या संदर्भातील मुद्दे समोर ठेवण्यात आले. मैदानी संपली की लगेच काही दिवसांत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

मुंबई सशस्त्र पोलीस भरती मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

पोलीस भरतीच्या उमेदवारांकडून मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारी सुरू आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण मिळवणे उमेदवाराला बंधनकारक असणार आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे. 

राज्यातील पोलिस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज आहे आहेत. तुरूंग विभागातील शिपाई या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9 हजार 595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत.