UPSC चा गेल्या 12 वर्षातील यंदा सर्वात कमी कटऑफ

UPSC कडून प्री परीक्षेचे स्वरूप, कठीण्य पातळी, प्रश्नांचे स्वरूप, विविध विषयांना दिले जाणारे गुण यामध्ये सातत्याने बदल केला जातो. हे कटऑफ खाली घसरण्याचे मुख्य कारण आहे.

UPSC चा गेल्या 12 वर्षातील यंदा सर्वात कमी कटऑफ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्ससाठी कट ऑफ प्रसिद्ध केला आहे. यूपीएससीने गेल्या मंगळवारी निकाल जाहीर केला. आता UPSC ने नागरी सेवा परीक्षा 2023 (Civil Services Exam 2023)च्या प्रिलिम्स, मेन आणि फायनलचे कटऑफ गुण (Final Cutoff Marks)जाहीर केले आहेत. मात्र, घसरलेला कटऑफ हा चर्चेचा विषय बनला आहे, असे मानले जात आहे की जवळपास 12 वर्षात पहिल्यांदाच UPSC प्री चा कटऑफ इतका खाली आला आहे.

 UPSC प्री चा कटऑफ कमी का झाला, याविषयी एज्यूवार्ता शी बोलताना युनिक एकाडमीचे तुकाराम जाधव (Tukaram Jadhav of Unique Academy)म्हणाले, " UPSC कडून प्री परीक्षेचे स्वरूप, कठीण्य पातळी, प्रश्नांचे स्वरूप, विविध विषयांना दिले जाणारे गुण यामध्ये सातत्याने बदल केला जातो. हे कटऑफ खाली घसरण्याचे मुख्य कारण आहे. GS  ( जनरल स्टडीज ) या विषयाचे पॅटर्न सेट होऊ नये म्हणून आयोगाकडून विशेष काळजी घेतली जाते. या विषयातील स्पर्धेची पातळी कमी होऊ नये, म्हणून पारीक्षेची कठीण्य पातळी कायम बदलत असते. "

 यंदा CSAT  ( सिव्हिल सर्व्हिस अपटीट्युड टेस्ट ) या विषयात विचारले गेलेले प्रश्न खूप अवघड होते. IIT च्या विद्यार्थ्यांना देखील हे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे लक्षात आले. खरे तर या विषयांचे प्रश्न सामान्य विद्यार्थ्याने सोडवता आले पाहिजेत असे असतात. मात्र, यावर्षी CSAT ची कठीण्य पातळी वाढवल्यामुळे देखील कटऑफ खाली घसरला आहे," असेही तुकाराम जाधव यांनी सांगितले.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, यावेळी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्समधील सामान्य श्रेणीसाठी कटऑफ 75.41 आहे. तर EWS श्रेणीसाठी कटऑफ 98.02 आहे.  ओबीसी श्रेणीसाठी कटऑफ गुण 74.75 आहेत, तर एससीसाठी 59.25 आणि एसटीसाठी 47.82 आहेत.  शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील उमेदवारांमध्ये PwBD-1 साठी कटऑफ 40.40, PwBD-2 47.13, PwBD-3 40.40 आणि PwBD-5 33.68 आहे.

मुख्य परीक्षेच्या कटऑफ मध्ये  सामान्य श्रेणीसाठी 741, EWS साठी 706, OBC साठी 712, SC साठी 694, ST साठी 692 आहे. तसेच अपंग श्रेणीतील उमेदवारांमध्ये कटऑफ PwBD-1 साठी 673, PwBD-2 साठी 718, PwBD-3 साठी 396 आणि PwBD-5 साठी 445 आहे. यावेळी अंतिम परीक्षेत सामान्य श्रेणीसाठी 953, ईडब्ल्यूएससाठी 923, ओबीसीसाठी 919, एससीसाठी 890, एसटीसाठी 891 कटऑफ गुण होते. तर शारीरिक अपंग उमेदवारांमध्ये  PwBD-1 साठी कटऑफ 894 आहे, PwBD-2 930 आहे, PwBD-3 756 आणि PwBD-5 साठी 589 आहे.