MAH-M.HMCT, M.ARCH, MBA/MMS आणि MCA उमेदवारांच्या हरकतींचे वेळापत्रक प्रसिद्ध 

सीईटी सेलकडून (MAH-M.HMCT, M.ARCH, MBA/MMS AND MCA CET 2024) उमेदवारांच्या तक्रारी/ हरकतींचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MAH-M.HMCT, M.ARCH, MBA/MMS आणि MCA उमेदवारांच्या हरकतींचे वेळापत्रक प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्षे २०२४-२५ (Academic Years 2024-25) करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या (Post Graduate Course) प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यातच आता सीईटी सेलकडून (MAH-M.HMCT, M.ARCH, MBA/MMS AND MCA CET 2024) उमेदवारांच्या तक्रारी/ हरकतींचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्याद्वारे उमेदवारांकडून सामायिक प्रवेश परीक्षेतील तक्रारी लागवल्या जातील, आणि त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

तक्रारी/हरकती नोंदवण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे 

MAH-M.HMCT CET चे उमेदवार २७ मार्च ते २९ मार्चपर्यंत आपल्या तक्रारी/हरकती  नोंदवतील. 

MAH-M.ARCH CET चे उमेदवार २७ मार्च ते २९ मार्चपर्यंत आपल्या तक्रारी/हरकती नोंदवतील. 

MAH-MBA/MMS CET चे उमेदवार १ एप्रिल ते ३ एप्रिलप्रर्यंत आपल्या तक्रारी/हरकती नोंदवतील.

MAH-MCA CET चे उमेदवार १ एप्रिल ते ३ एप्रिलप्रर्यंत आपल्या तक्रारी/हरकती नोंदवतील.

उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये "OBJECTION TRACKER" सोय उपलब्ध करून दिले आहे. तक्रार/हरकती नोंदवायची असल्यास त्यांना लॉगिनद्वारे सादर करता येणार आहे. परीक्षेच्या संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर उमेदवाराला आक्षेप असल्यास, तो उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसारच लॉगिन करून सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला आपल्या स्वतःच्या लाॅग इन आयडीवरुन तक्रार मांडता येणार आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org ला भेट द्यावी.