ऑल इंडिया बार परीक्षेची अंतिम उत्तर सूची प्रसिध्द

उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची सखोल तपासणी व पुनर्विलोकन करण्यात आले असून त्यानंतरच अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आली आहे.

ऑल इंडिया बार परीक्षेची अंतिम उत्तर सूची प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑल इंडिया बार परीक्षेची (all india bar exam)अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध झाली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (Bar Council of India-BCI) ने आज 21 मार्च 2024 रोजी AIBE ची अंतिम उत्तर सूची (AIBE CHI FINAL ANSWER)अधिकृत वेबसाइट www.allindiabarexamination.com वर प्रसिद्ध केली आहे. अंतिम उत्तर सूची जाहीर झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.अंतिम निकाल उत्तर सूचीच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची सखोल तपासणी व पुनर्विलोकन करण्यात आले असून त्यानंतरच अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे बार कौन्सिल ऑफ इंडिया, BCI कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

BCI ने 10 डिसेंबर 2024 रोजी AIBE 18 परीक्षा आयोजित केली होती. परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली. यानंतर, जे उमेदवार AIBE 18 तात्पुरत्या उत्तरपत्रिकेवर समाधानी नव्हते, त्यांना 20 डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. या आक्षेपांचा विचार केल्यानंतर आता अंतिम उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.

ऑल इंडिया बार परीक्षा अंतिम उत्तर की अशी करा डाउनलोड 

* ऑल इंडिया बार परीक्षा अंतिम उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://www.allindiabarexamination.com/ ला भेट द्यावी लागेल. 
* आता मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या AIBE 18 अंतिम उत्तर की लिंकवर क्लिक करा. 
* एक नवीन PDF फाईल उघडेल, जिथे उमेदवार उत्तरे तपासू शकतात.
* पृष्ठ डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.