UPSC प्रिलिम्स 2024 परीक्षा 26 मे रोजी होणार.. 

UPSC प्रिलिम्स 2024 ही केवळ पात्रता परीक्षा आहे. त्याचे गुण अंतिम परीक्षेत जोडले जात नाहीत. पण मुख्य परीक्षेला बसण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 

UPSC प्रिलिम्स 2024 परीक्षा 26 मे रोजी होणार.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लोकसेवा आयोग UPSC प्रिलिम्स 2024 (UPSC Prelims 2024) परीक्षा 26 मे रोजी (Exam on 26th May) घेणार आहे. UPSC प्रिलिम्स 2024 ही केवळ पात्रता परीक्षा आहे. त्याचे गुण अंतिम परीक्षेत जोडले जात नाहीत. पण मुख्य परीक्षेला (UPSC Main Exam) बसण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य (Passing the exam is mandatory) आहे. आयोगाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी यूपीएससी प्रिलिम्स 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली. ज्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. आता 26 मे रोजी ही परीक्षा होणार आहे. 

UPSC प्रिलिम्स 2024 परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. ज्यामध्ये दोन पेपर असतील. या दोन्ही पेपरमध्ये सामान्य अध्ययनातून प्रश्न विचारले जातील. या पेपरमध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, पर्यावरण, विज्ञान आदी विषयांचे प्रश्न विचारले जातील. या पेपरला CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असेही म्हणतात. या दोन्ही पेपरमध्ये मल्टिपल चॉइस (MCQ) प्रकारचे प्रश्न विचारले जातील. दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी दोन तासांचा वेळ दिला जाईल. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंगही असेल.  हा पेपर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून घेतला जाईल.

दरम्यान , आयोगाने या वर्षापासून अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. त्यानुसार उमेदवारांनी प्रिलिम फॉर्ममध्ये अपलोड केलेले छायाचित्र ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी 10 दिवसांपेक्षा जुने नसावे. UPSC 2024 फॉर्ममध्ये अपलोड केलेल्या फोटोमध्ये उमेदवाराचे नाव आणि फोटो काढण्याची तारीख देखील लिहिलेली असावी. या फोटोतील उमेदवाराचा लूक UPSC परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर म्हणजे पूर्व, मुख्य आणि मुलाखतीत सारखाच असावा. म्हणजे फोटोत दाढी, चष्मा, मिशा किंवा इतर काही असेल तर परीक्षेच्या वेळी उमेदवार तसेच  दिसले पाहिजे.  जर उमेदवाराचा चेहरा फॉर्ममध्ये दिलेल्या फोटोशी जुळत नसेल तर उमेदवाराला परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही.