JEE Mains 2024: कठीण्य पातळी बाबत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NTA ने दिले स्पष्टीकरण 

परीक्षेच्या कठीण्य पातळीमुळे उमेदवारांना फायदा किंवा गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी पर्सेंटाइल स्कोअरवर आधारित सामान्यीकरण प्रक्रिया वापरली गेली, NTA चे स्पष्टीकरण

JEE Mains 2024: कठीण्य पातळी बाबत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NTA ने दिले स्पष्टीकरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने नुकताच (JEE Mains 2024) सत्र 1 चा निकाल प्रसिद्ध  (Results released) केला. यामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि टक्केवारी यात बरीच तफावत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देणारी अधिसूचना NTA ने जारी केली आहे. NTA ने म्हटले आहे की, "परीक्षेच्या कठीण्य पातळीमुळे (difficulty level) उमेदवारांना फायदा किंवा गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी पर्सेंटाइल स्कोअरवर आधारित सामान्यीकरण प्रक्रिया वापरली गेली." 

"NTA ने स्वीकारलेल्या निकषांनुसार, सामग्रीमध्ये समान स्वरूपाच्या विविध प्रश्नपत्रिका तयार केल्या गेल्या आणि प्रत्येक शिफ्टला प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या काठीण्य पातळीची कोणतीही माहिती न घेता सरसकटपणे प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या. जेईई मुख्य सत्र 1 कोणत्याही उच्च-स्तरीय परीक्षा आयोजित करण्यासाठी स्वीकारलेल्या नियम आणि प्रक्रियेनुसार आयोजित केले गेले आहे."

जानेवारीच्या सत्रात एकूण 11 लाख 70 हजार 036 उमेदवार जेईई मुख्य पेपर 1 साठी उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी असा दावा केला की जेईई मेनच्या गुणांच्या तुलनेत टक्केवारीत मोठी तफावत होती. 27 आणि 29 जानेवारीच्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. परीक्षेच्या वेगवेगळ्या सत्रात विद्यार्थ्यांना एक सारखे गुण असले तरी त्यांच्या टक्केवारीत तफावत आहे, असा दावा विद्यार्थ्यांनी केला होता.