कौतूक सोहळ्याने भारावले नवनियुक्त अधिकारी; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला गौरव

एमपीएससी परीक्षेत सलग दोनदा राज्यात प्रथम आलेले डीवायएसपी प्रमोद चौगुले, डीवायएसपी संतोष खाडे, पीएसआय स्नेहा पवार यांच्यासह इतर पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

कौतूक सोहळ्याने भारावले नवनियुक्त अधिकारी; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला गौरव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Pune News : अधिकारी म्हणून सेवेत रूजू झाल्यानंतर सामान्य जनतेसाठी काम करायला हवे. बदली कुठे होईल याची चिंता न करता मिळेल तिथे प्रामाणिकपणे काम करा, असे मार्गदर्शन राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे (Pravin Darade) यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना केले. पिनाकी फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'यशवंतांचा गौरव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रविण दराडे बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गंगाखेड विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) उपस्थित होते. तर दराडे यांच्यासह मुंबईच्या प्राप्तीकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, मुंबईच्या शहर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कौतूक सोहळ्यात अधिकारी भारावून गेले होते.

Talathi Bharti : पेपर डाऊनलोड करण्यासाठी लॅपटॉप थेट परीक्षा केंद्राबाहेर, विद्यार्थ्यांकडून आक्षेप

एमपीएससी (MPSC) परीक्षेत सलग दोनदा राज्यात प्रथम आलेले डीवायएसपी प्रमोद चौगुले (DYSP Pramod Chougule), डीवायएसपी संतोष खाडे (DYSP Santosh Khade), पीएसआय स्नेहा पवार (PSI Sneha Pawar) यांच्यासह इतर पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन महेश बडे, किरण निंभोरे, श्रीराम सातपुते आणि अंकुश धवणे यांनी केले होते.

यावेळी बोलताना आमदार गुट्टे म्हणाले, अधिकारी म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जास्त लक्ष द्या. बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी अधिकाऱ्यांकडे अनेक चकरा माराव्या लागतात. तशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ देऊ नका, असे अवाहनही गुट्टे यांनी केले.

अधिकारी होणे ही जनतेसाठी काम करण्याची खूप मोठी संधी आहे. या संधीचे तुम्ही सोने करा, असे म्हणत पल्लवी दराडे यांनी शासकीय अधिकारी म्हणून किती चांगले काम करू शकता, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच महिला अधिकारी म्हणून काम करत असताना असे कधीच समजू नका की. मी महिला आहे म्हणून पुरूष अधिकाऱ्याप्रमाणे काम करू शकत नाही. जर तुम्ही ठरवले तर तुम्ही पुरूष अधिकाऱ्यांपेक्षाही चांगले काम करू शकता, असा संदेश दराडे यांनी यावेळी नवनियुक्त महिला अधिकाऱ्यांना दिला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo