अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरती निकाल जाहीर

हजारो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला आणि आता ते आतुरतेने वाट पाहत असलेला निकाल जाहीर झाला आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ mahafood.gov.in यावर पाहाता येणार आहे.  

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरती निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने (FCS) एकूण ३४५ रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक (गट-सी) आणि पुरवठा निरीक्षक (गट-सी) (Senior Clerk (Group-C) and Supply Inspector (Group-C)) पदांसाठी भरती परीक्षा घेतल्या. 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत या परीक्षा झाल्या होत्या. परीक्षा दिलेले हजारो उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत होते,अखेर परीक्षेचा निकाल जाहीर (Results announced) झाला असून उमेदवारांना या https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.  

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १२ डिसेंबर २०२३ रोजी एकूण ३४५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२४ रोजी हॉल तिकिट प्रसिद्ध करण्यात आले तर २६ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा घेण्यात आला. तेव्हापासून परीक्षा दिलेले उमेदवार निकाल कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहात होते, अखेर मंगळवार दि. १८ जून रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग २०२३ निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक परीक्षा 2024 अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्रामध्ये अन्न पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक (गट क) पदांच्या पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली होती. ज्यासाठी अधिकाऱ्यांनी 345 रिक्त पदे जाहीर केली होती. ज्या उमेदवारांची नावे महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक निकाल 2024 मध्ये निवडली जातील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.