MPSC Exam : संयुक्त (पूर्व) परीक्षेतील दोन प्रश्न रद्द; आयोगाकडून अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द

आयोगामार्फत ३० एप्रिल रोजी सामान्य क्षमता चाचणी विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

MPSC Exam : संयुक्त (पूर्व) परीक्षेतील दोन प्रश्न रद्द; आयोगाकडून अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द
MPSC Answer Key

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ३० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा (Joint Pre Exam) २०२३ ची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) प्रसिध्द करण्यात आली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रश्नपत्रिकेतील दोन प्रश्नही रद्द करण्यात आला आहे. (MPSC Examination 2023)

आयोगामार्फत ३० एप्रिल रोजी सामान्य क्षमता चाचणी विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय सादर केले होते.

'प्लॅन ए' फसला तरी उमेश घाडगे मागे हटले नाहीत; MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करत बनले यशस्वी उद्योजक

आयोगाने हरकती व अभिप्रायांचा विचार करून उत्तरतालिका सुधारित केली असून ती अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात आली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारत घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयोगाने प्रसिध्द केलेल्या उत्तरतालिकेतील दोन प्रश्नही रद्द करण्यात आले आहे. संच एमधील प्रश्न क्रमांक १९ व ७४, संच बी मधील प्रश्न क्रमांक ११ व ८०, संच सी मधील १७ व ७७ आणि संच डी मधील १६ व ७७ क्रमांकाचे प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. आयोगाने # या चिन्हाद्वारे रद्द केलेले प्रश्न उत्तरतालिकेत दर्शविले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo