JEE Main : ७५ टक्के पात्रता निकष काय आहे?

सर्व उमेदवार जे NIT, IIIT आणि इतर CFTI मध्ये प्रवेशासाठी पात्र आहेत, ज्यांचे प्रवेश JEE मेन रँकवर आधारित आहेत.

JEE Main : ७५ टक्के पात्रता निकष काय आहे?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आयआयटी (IIT), एनआयटी (NIT), आयआयआयटी (IIIT) आणि सीएफटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना जेईई मुख्य (JEE Main) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्जाच्या तपशीलांसह, एजन्सीने जेईई मेन २०२४ उमेदवारांसाठी पात्रता निकष देखील जारी केले आहेत. या निकषांमध्ये ७५ टक्के निकष पात्रता महत्वाचा आहे.

 

अधिकृत माहिती पुस्तिकेनुसार, सर्व उमेदवार जे NIT, IIT आणि इतर CFTI मध्ये प्रवेशासाठी पात्र आहेत, ज्यांचे प्रवेश JEE मेन रँकवर आधारित आहेत. त्यांनी बारावीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के किंवा संबंधित मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत २० टक्के गुण मिळालेले असावेत. SC/ST उमेदवारांसाठी, इयत्ता १२ वी परीक्षेतील पात्रता गुण ६५ टक्के असावेत.

JEE मेन २०२४ साठी नोंदणी सुरु

 

उमेदवारांनी प्रत्येक विषयात इयत्ता १२ वी/पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २०२० मध्ये कोरोना काळात   झालेल्या प्रवेशाच्या शेवटच्या तीन आवृत्त्यांमध्ये पात्रता निकष काढून टाकण्यात आले होते, परंतु २०२३ च्या बॅचसाठी ७५ टक्के पात्रता निकष पुहा लावण्यात आला. दरम्यान, ७५ टक्के पात्रता निकष गेल्या वर्षी वादात सापडले होते. 

 

JEE Main 2023 उमेदवारांनी दावा केला की NTA ने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पात्रता निकष पुनर्संचयित केले होते, ज्यामुळे उमेदवार आश्चर्यचकित झाले आणि अनेकांना पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी समस्या निर्माण झाल्या. उमेदवारांनी दावा केला की जे उमेदवार  १२ वीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवू शकले नाहीत, विशेषत: ज्यांच्यासाठी २०२३ मध्ये प्रवेश परीक्षेला बसण्याची ही शेवटची संधी होती, त्यांची या निर्णयामुळे  निराशा झाली, असा दावा करण्यात आला होता.  

 

यानंतर, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई मेन २०२३ पात्रता निकषांसाठी आणखी एक सुधारित घोषणा केली होती. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की जेईई मेनमधील उमेदवाराच्या अखिल भारतीय रँक (एआयआर)  व्यतिरिक्त, विद्यार्थ्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत किंवा टॉप २० पर्सेंटाइलमध्ये असणे आवश्यक आहे. या निर्णयावर वर देखील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.  उमेदवारांनी असा दावा केला की,  'टॉप 20 पर्सेंटाइल' च्या पात्रतेच्या निकषांमध्ये एकसमानता नाही कारण ती बोर्डानुसार बदलते.'

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO