NEET UG 2024 साठी नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 16 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे.

NEET UG 2024 साठी नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET)  UG 2024 साठी निर्धारित तारखांमध्ये अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 16 मार्च 2024 पर्यंत वाढवली (Date extended to 16 March 2024) आहे. NTA ने अधिकृत वेबसाईटवर (Official website) एक अधिसूचना जारी करून ही माहिती शेअर केली आहे.

 उच्छूक उमेदवारांना  NTA exams.nta.ac.in/NEET/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अर्ज भरताना काही समस्या येत असल्यास, उमेदवार हेल्पलाइन क्रमांक 011-40759000 वर संपर्क साधू शकतात. किंवा neet@nta.ac.in या मेलद्वारे  समस्या सोडवू शकतात. 

NEET UG 2024 साठी अर्ज करण्यासाठी जनरल श्रेणी आणि NRI विद्यार्थ्यांना 1700 रुपये, जनरल EWS आणि OBC NCL श्रेणींसाठी 1600 रुपये आणि SC/ST/PWBD आणि ट्रान्स जंडर उमेदवारांना 1000 रुपये भरावे लागतील. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा केले जाऊ शकते. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

NEET UG 2024 अर्ज कसा भरणार

प्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर जा. नोंदणीसाठी येथे क्लिक करा. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करुन लाॅग इन करा. उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात ऑनलाइन नोंदणी करावी. दुसऱ्या टप्प्यात, उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटच्या टप्प्यात, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.