अखेर विद्यापीठाकडून कमवा व शिका योजनेला हिरवा कंदील ; 'एज्युवार्ता'च्या बातमीचा परिणाम

अखेर विद्यापीठाकडून कमवा व शिका योजनेला हिरवा कंदील ; 'एज्युवार्ता'च्या बातमीचा परिणाम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयांमध्ये 'कमवा व शिका' योजना (Earn and Learn Scheme) चालू शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यास विद्यापीठाने अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच संलग्न महाविद्यालयातील (Affiliated College ) विद्यार्थ्यांच्या हाताला काम आणि शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणार आहेत. एज्युवार्ताने सर्व प्रथम या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर विद्यापीठाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : MBBS, BDS Admission : रिक्त जागांवर प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू, निवड झाल्यास प्रवेश बंधनकारक

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल ,गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य व्हावे , स्वयं रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे, विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी, विविध प्रकारची कामे करून मिळणाऱ्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने कमवा व शिका योजना राबविले जाते. मात्र,अर्धा सप्टेंबर महिना संपला तरीही कमवा व शिका योजना सुरू करण्यास विद्यापीठाकडून मंजुरीच मिळाली नाही.परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले.यावर विद्यार्थ्यांचे डोळे कमवा व शिका योजनेच्या मंजूरीकडे या मथळ्यावरील वृत्त एज्युवार्ताने प्रसिध्द केले होते.त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जागा आली.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कमवा व शिका योजनेच्या प्रस्तावर चर्चा होऊ शकली नाही.त्यामुळे सुमारे एक महिना या योजनेची अंमलबजावणी रखडली होती.अखेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी या प्रस्तावास बुधवारी मंजूरी दिली. तसेच त्यामूळे महाविद्यालयातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.तसेच महाविद्यालयांना या योजनेसाठी आगाऊ रक्कम अदा करण्यात आली आहे.

--------------------------

 " कमवा व शिका योजनेच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयांना आगाऊ रक्कम अदा करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. "

- डॉ.सुरेश गोसावी, कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे 
-------------------