प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे निधन

दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये  शिक्षक संघाच्या वतीने वाजे यांच्याच नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष म्हणून गेल्या काही वर्षांपासून ते काम पाहता होते.

प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे निधन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे (Primary Teachers Association-) राज्याध्यक्ष अंबादास वाजे ( Ambadas Waje) यांचे बुधवारी पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.नाशिक जिलह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील शाळेवर ते कार्यरत होते. शिक्षकांचे प्रश्न शासन दारबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. 

हेही वाचा : शिक्षण शासनाविरोधात एल्गार; पुण्यातील महामोर्चात हजारो शिक्षकांचा आक्रोश

दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये  शिक्षक संघाच्या वतीने वाजे यांच्याच नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष म्हणून गेल्या काही वर्षांपासून ते काम पाहता होते.शिक्षकांना शिकवू द्या, त्यांची अशैक्षणिक कामे बंद करा, यासाठी त्यांनी लढा उभा केला. शिक्षकांचा निवृत्ती वेतानाचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शासकीय शाळा टिकाव्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे,अशी त्यांची भूमिका होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरे येथे प्रभारी केंद्रप्रमुख पदावरती अंबादास वाजे कार्यरत होते. रात्री साडेदहा वाजता अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना सिन्नर येथील शिवाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  परंतु पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली .वाजे यांच्या रूपाने  उत्तर महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र शिक्षक संघाचा अध्यक्ष पदाचा मान मिळाला होता.

शिक्षक, प्रशासन ,विद्यार्थी यांच्यातील समन्वयाद्वारे अंबादास वाजे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असताना आपल्या कार्य कुशल तेचा ठसा उमटवत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष साधत असताना पालकांबरोबर समन्वय साधण्याचे काम वाजे यांनी केले होते. ज्ञानगंगा  ग्रामीण भागातील घरोघरी पोहोचवण्याचं काम वाजे यांच्या इच्छाशक्तीतून झालेले दिसते. आदिवासी गरीब ,होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू करून पालकत्वाची जबाबदारी वाजे यांनी स्वीकारली होती. अत्याधुनिक  वाचनालय चळवळीत सहभाग घेऊन पुस्तकांनी मस्तक बदलण्याचे काम वाजे सरांच्या कार्यक्षमतेचे प्रतीक समजण्यात येते.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले,शिक्षक संघाचे स्वच्छ, स्पष्ट आणि करारी नेतृत्व हरपेले आहे.वाजे यांच्या जाण्याने शिक्षक संघाचे कधीही भरून येणार नाही,असे मोठे नुकसान झाले आहे.