प्लीज सर पास करा, नाहीतर वडील लग्न लावून देतील.. विद्यार्थिनीचे भावनिक पत्र, फोटो व्हायरल

माझे वडील शेतकरी आहेत, ते ४०० रुपये देखील कमवत नाहीत आणि मला कसे शिकवणार? ही समस्या आहे दुसरे काही नाही, असे तिने भावनिक पत्रात लिहिले आहे. 

प्लीज सर पास करा, नाहीतर वडील लग्न लावून देतील.. विद्यार्थिनीचे भावनिक पत्र, फोटो व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपुर्वीच बिहार बोर्डाच्या (Bihar Board of Education) दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या (The exam is over) असून  सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे (checking the answer sheet has started) काम सुरु आहे. यावेळी उत्तरपत्रिकामध्ये काही विद्यार्थ्यांनी भावनिक पत्र, (students Emotional letter) कविता किंवा कोणत्या तरी प्रकारची विनंती केलेली दिसून येत आहे. त्यातच आता प्लीज सर मला पास करा, नाहीतर वडील लग्न लावून देतील.. अशा प्रकारची विद्यार्थिनीने उत्तरपत्रिकेत लिहिलेली भावनिक चिठ्ठीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहे. 

नुकत्याच बिराहच्या मॉडेल स्कूलमध्ये बिहार बोर्डाच्या दहावीच्या उत्तरपत्रिका तपासताना ही घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा संपल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम केले जात आहे. तपासल्या जात असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये अशा प्रकारची उत्तरे लिहिण्यात आली आहेत.  

हेही वाचा : विद्यार्थ्यांना होमवर्क अर्थात गृहपाठ देऊ नका : राज्यपाल रमेश बैस असं का म्हणाले..

उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी काय लिहिले? 

काही दिवासंपुर्वीच बिहार बोर्डाच्या उत्तरपत्रिकेतील एक मुलीने वडिलांचे निधन झाले, त्यामुळे तिला अभ्यास करता आला नाही. मला पास करा असे भावनिक पत्र लिहिले होते. त्यानंतर आता एका विद्यार्थ्याने लिहिले की माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत. त्यामुळे सर मला पास करा.

तर एका विद्यार्थ्यीनीने भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. माझे वडील शेतकरी आहेत. माझ्या शिक्षणाचा  भार ते उचलू शकत नाही. त्यामुळे ते मला शिकवू शकत नाहीत. जर मला ३१८ गुण नाही मिळाले तर ते माझे लग्न लावून देतील. कृपया माझी इज्जत वाचवा. मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, ते ४०० रुपये देखील कमवत नाहीत आणि मला कसे शिकवणार? ही समस्या आहे दुसरे काही नाही, असे तिने भावनिक पत्रात लिहिले आहे.