NEET  कट ऑफ  शून्यावर आणून सुद्धा सातशेच्यावर जागा रिक्तच 

पीजी अभ्यासक्रमात २४७ जागा रिक्त आहेत.तर यूजी अभ्यासक्रमाच्या ४८५ जागाही रिक्त आहेत.

NEET  कट ऑफ  शून्यावर आणून सुद्धा सातशेच्यावर जागा रिक्तच 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी NEET  परीक्षा घेतली जाते. यावेळी एनईईटी पीजी (NEET PG) प्रवेशासाठीचे कट ऑफ गुण (cut off properties ) शून्यावर आले, परंतु तरीही पीजी (PG)अभ्यासक्रमात २४७ जागा रिक्त आहेत. याशिवाय यूजी (UG) अभ्यासक्रमाच्या ४८५ जागाही रिक्त आहेत. या सर्व जागा अखिल भारतीय कोट्यातील (All India Quota) आहेत. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. चालू शैक्षणिक सत्रात यूजी आणि पीजी मेडिकलच्या किती जागा रिक्त आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी रिक्त जागांची आकडेवारी दिली.

हेही वाचा : ICSE board exam timetable : ICSE बोर्डाच्या १० वी, १२ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

भारती पवार म्हणाल्या, "सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या आराखड्यानुसार अखिल भारतीय कोट्यातील वैद्यकीय जागांवर प्रवेश झालेले नाहीत. रिक्त जागा भरण्यासाठी, पीजी प्रवेशासाठी किमान पात्रता टक्केवारी शून्यावर आणली गेली. जेणेकरून NEET PG परीक्षेला बसणारा प्रत्येक उमेदवार समुपदेशनात सहभागी होऊ शकेल. NEET PG च्या रिक्‍त जागा भरण्‍यासाठी, समुपदेशनादरम्यान एक विशेष जागा भरण्‍यात आली.

त्या म्हणाल्या  की,  "२०१४ पासून एमबीबीएसच्या ११२ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या २०१४ मध्ये ३८७ वरून ७०६ झाली आहे. या कालावधीत MBBS च्या जागा ५१ हजार ३४८  वरून १ लाख, ८ हजार ९४०  पर्यंत आणि PG च्या जागा ३१ हजार, १८५ वरून ७० हजार, ६७४  पर्यंत वाढल्या आहेत.