UPSC 2023 : पूर्व परीक्षा होणार का रद्द? न्यायालयाचा निकाल आज
पूर्व परीक्षा रद्द करण्याची आणि प्राथमिक परीक्षा आणि सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ चे पेपर पुन्हा आयोजित करावी, या मागणीसाठी १७ नागरी सेवा इच्छुक उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC 2023) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२३ च्या प्राथमिक परीक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) आज (दि. ३ जुलै) रोजी सुनावणी होणार आहे. पूर्व परीक्षा रद्द करण्याची आणि प्राथमिक परीक्षा आणि सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ चे पेपर पुन्हा आयोजित करावी, या मागणीसाठी १७ नागरी सेवा इच्छुक उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे.
विशेष म्हणजे याचिकेत यूपीएससीने १२ जून रोजी जारी केलेल्या पूर्व परीक्षेचा निकालालाही आव्हान देण्यात आले आहे. तात्काळ प्रभावाने उत्तरसुची प्रकाशित करण्यासाठी आयोगाला निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, "जेव्हा कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाते, तेव्हा बहुपर्यायी प्रश्नांसाठी उत्तरसुची अगोदरच तयार केल्या जातात, जेणेकरून परीक्षा झाल्यानंतर त्या प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. जेणेकरून उमेदवारांना मूल्यांकनाची योग्य कल्पना मिळू शकेल.
राज्यातील ITI च्या जागांवर इतर विभागांचा डोळा; शिंदे सरकारला काढावा लागला जीआर
दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा, आयआयटी, एनएलयू आणि आयआयएम अशा जवळजवळ सर्व राज्य लोकसेवा आयोग आणि इतर प्राधिकरणे परीक्षा आयोजित केल्याच्या एका आठवड्याच्या आत तात्पुरत्या उत्तरसुची जारी करतात आणि हरकती मागवतात, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
आक्षेपांच्या आधारे त्यांच्या अंतिम उत्तरसुची प्रसिद्ध करतात. पण UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या परीक्षेची उत्तरसुची देण्यात आली नव्हती, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे सर्वच परीक्षार्थींचे लक्ष लागून राहिले आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.