ICSE board exam timetable : ICSE बोर्डाच्या  १० वी, १२ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 

इयत्ता १० वी  ICSE बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर बारावीच्या परीक्षा येत्या १२ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे . 

ICSE board exam timetable : ICSE  बोर्डाच्या  १० वी, १२ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE)  बोर्डाच्या  १० वी, १२ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत.  विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org वरून वेळापत्रक  डाउनलोड करू शकतात. इयत्ता १० वी  ICSE बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर बारावीच्या परीक्षा येत्या १२ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे . 

वेळापत्रकानुसार, परीक्षा येत्या  ४ मार्च पर्यंत चालणार आहे.  शेवटचा  कला विषयाचा पेपर सकाळी 9 ते दुपारी 2  वाजेपर्यंत असेल तर  इतर विषयांसाठी सकाळी 11  वाजल्यापासून दुपारी 1  वाजेपर्यंत  परीक्षा होईल. कला विषयाच्या पेपरचा कालावधी 3 तास ​​आणि इतर विषयांचा कालावधी २ तासांचा असेल. १२वी बोर्डाच्या परीक्षा येत्या 12  फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 3  एप्रिल 2024 रोजी संपतील. परीक्षा सर्व दिवस दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल. परीक्षेचाचा निकाल  मे 2024 मध्ये घोषित केला जाईल.

हेही वाचा : 5th and 8th Exams : पाचवीसाठी 50 तर आठवीसाठी 60 गुणांची परीक्षा ; नापास झाल्यास त्याच वर्गात


 असे डाउनलोड करा वेळापत्रक 

* cisce.org वर CISCE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ICSE, ISC बोर्ड परीक्षा 2024 टाइम टेबल लिंकवर क्लिक करा.
* एक नवीन PDF फाइल उघडेल जिथे उमेदवार तारखा पाहू शकतात.
* पृष्ठ डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी प्रिंटाऊट घ्या.