कॉर्मसच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी; विद्यापीठातर्फे ‘जॉब फेअर २०२४’ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभाग व आयसीए एज्यु स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जॉब फेअर २०२४’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉर्मसच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी; विद्यापीठातर्फे ‘जॉब फेअर २०२४’ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभागातर्फे(Savitribai Phule Pune University) कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी (Department of Commerce)‘जॉब फेअर २०२४’ चे (job fair 2024)आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ जून रोजी विद्यापीठाच्या कॉमर्स विभागात होणाऱ्या या मेळाव्यात १४ पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात राज्यातील सर्व विद्यापीठातील कॉमर्स पदवीधारक विद्यार्थ्यांना (Commerce graduate student)सहभागी होता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभाग व आयसीए एज्यु स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जॉब फेअर २०२४’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात  एसएसएलए चार्टर्ड अकाउंटंट्स, कनेक्ट बिझनेस सोल्युशन, ग्लोबल पार्टनर्स, परम कॉर्पोरेशन लिमिटेड, सापिओ अॅनालिटिक्स,  कंपनी बेचो प्रायवेट लिमिटेड, टाईम्स ग्रुप, सिएल एचआर सर्विसेस लिमिटेड, ऑफशोर अकाउंटींग अँड टॅक्सेशन  सर्विसेस प्रा. लि, Nexdigm आदीं सारख्या १४ नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

या मेळाव्यात बी.कॉम, बी.बी.ए, बी.ए, एम.कॉम आणि एम.बी.ए पास विद्यार्थ्यांच्या  मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  राज्यातील सर्व विद्यापीठातील पदवीधारक विद्यार्थ्यांना  या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छूक उमेदवार ८६१७२५४८६५ या क्रमांकावर नोंदणी करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. नोंदणीकृत उमेदवारांसाठी यावेळी रोजगारासंबंधी मार्दर्शनपर वर्कशॉपही आयोजित करण्यात आले आहे.