विद्यापीठ हे पैसे कमावण्याचे माध्यम आहे काय? ; आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावा - शशिकांत तिकोटे

राज्यपालांनी रॅप सॉंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे  अहवाल सादर केला आहे.

विद्यापीठ हे पैसे कमावण्याचे माध्यम आहे काय? ; आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावा - शशिकांत तिकोटे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न (student hostel problem) तात्काळ सोडवावा, रॅप सॉंग (Rap Song) प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी,‌ विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील (Pune University management Council) सदस्यांनी स्वहिताचा विचार न करता विद्यार्थी त्याचा विचार करून व्यवस्थापन परिषदेत  निर्णय घ्यावे. तसेच रखडलेल्या प्र-कुलगुरूंची नियुक्ती करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन माजी अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना दिले आहे.

हेही वाचा: SPPU News : प्र-कुलगुरू निवडीला उरले काही तास; पूर्वीचे नाव मागे, नव्या नावांची चर्चा

विद्यापीठात चित्रित केलेल्या रॅप सॉंगमुळे काही दिवसांपूर्वी मोठा वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणी राज्यपालांनी रॅप सॉंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे अहवाल सादर केला आहे. मात्र,त्या अहवालाचे पुढे काय झाले ,असा प्रश्न तिकोटे यांनी उपस्थित केला आहे. तसेच विद्यापीठातील भरती प्रक्रियेत चुकीच्या बाबी घडल्या असल्याची चर्चा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे विद्यापीठ हे पैसे कमावण्याचे माध्यम आहे काय?  अशी शंका उपस्थित होते. व्यवस्थापन परिषदेमध्येच चुकीच्या गोष्टी घडत असतील तर विद्यार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायची. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी सदस्यांनी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने चर्चा करावी.तसेच त्यांचे प्रश्न सोडवावेत. 

विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने वसतिगृह मिळत नसल्याने विद्यापीठाच्या कुलगुरूंना आत्महत्या करण्यासंदर्भातील पत्र लिहिले होते. ही बाब धक्कादायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न प्रशासनाने तात्काळ सोडवावा. प्र-कुलगुरू नसल्यामुळे अनेक प्रशासकीय कामे अडकली आहेत. त्यामुळे कुलगुरूंनी लवकरात लवकर उपकुलगुरूंची नियुक्ती करावी, आदी मागण्या तिकोटे यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.