डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नव्या वर्षात नवे कुलगुरू ; 4 जानेवारीला अंतिम मुलाखती

डॉ. संजय ढोले आणि डॉ. विलास खरात तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव आणि प्रा.राजेंद्र काकडे या अंतिम पाच उमेदवारांमधून एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नव्या वर्षात नवे कुलगुरू ; 4 जानेवारीला अंतिम मुलाखती
Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही कारणास्तव स्थगित करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू (vice chancellor) पदाच्या मुलाखती आता येत्या 4 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता राजभवन येथे घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात विद्यापीठाला नवे कुलगुरू (Vice-chancellor of the university in the new year) मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र,अंतिम पाच उमेदवारांपैकी कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Dr. Sanjay Dhole, Dr. Vilas Kharat, Dr. Vijay Phulari, Jyoti Jadhav, Prof. Rajendra Kakade)

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) डॉ. संजय ढोले आणि डॉ. विलास खरात तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव आणि प्रा.राजेंद्र काकडे या अंतिम पाच उमेदवारांमधून एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार आहे.काही दिवसांपूर्वी  या उमेदवारांच्या मुलाखती १९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता घेतल्या जाणार होत्या.मात्र, काही कारणास्तव या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या होत्या.दोन दिवसांपूर्वी उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबत मेल प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा : 'एमफिल'ला प्रवेश घेऊ नका ; युजीसीने पदवी केली कायमची बंद

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाल संपत आला आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी कुलगुरू शोध समितीने निवडलेल्या २४ पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांच्या निवडीवर उलटसुलट चर्चा झाल्या होत्या. मात्र, तरीही २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ उमेदवारांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले, तसेच डॉ.विलास खरात यांचा समावेश होता.त्यातून डॉ.संजय ढोले व डॉ.विलास खरात यांची अंतिम पाच उमेदवारांच्या यादीत निवड झाली आहे.