आता 'आरटीई'चा अर्ज भरा २५ मार्चपर्यंत
आरटीई प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. मात्र, कागदपत्र काही मिळवण्यास विलंब होत असल्याने पालकांनी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानुसार येत्या २५ मार्चपर्यंत मदतवाढ दिली आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षण जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस येत्या 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणांनी अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. मात्र, कागदपत्र काही मिळवण्यास विलंब होत असल्याने पालकांनी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानुसार येत्या २५ मार्चपर्यंत मदतवाढ दिली आहे.
राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी आतापर्यंत सर्वाधिक ३ लाख १४ हजार ३९५ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील १५ हजार ६५५ जागांसाठी ६८ हजार १५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. पालकांच्या मागणीनुसार सध्या मदतवाढ देण्यात आली असली तरी २५ मार्चनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; याची नोंद घ्यावी,असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
eduvarta@gmail.com