CUET PG : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट प्रक्रियेला सुरूवात

देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर येत्या  ११ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत ही परीक्षा घेतली जाईल.

CUET PG : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट प्रक्रियेला सुरूवात
 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट -२०२४ (University Entrance Test 2024) पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नोंदणी सुरू केली असून पात्र उमेदवारांना येत्या 24 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.  CUET चा परीक्षा अर्ज  pgcuet.samarth.ac.in. अधिकृत वेबसाइटवरून भरता येईल. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर येत्या  ११ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत ही परीक्षा घेतली जाईल. तर परीक्षेची उत्तर सूची येत्या ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
CUET PG परीक्षा २०२४ साठी आगाऊ शहर सूचना स्लिप ४ मार्च  रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच ७ मार्च 2024 रोजी हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल.  दोन पेपरपर्यंत अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार २०० रुपये शुल्क आहे. तर OBC,  EWS साठी १ हजार  रुपये शुल्क आकारले जाईल.एससी, एसटी आणि ट्रान्स जेंडरसाठी ९०० रुपये शुल्क आकारले जाईल. विद्यार्थ्यांना  ऑनलाइन शुल्क जमा करता येईल. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अशी कोणतीही पद्धत वापराता येईल.

असा कराल अर्ज 

* अर्ज करण्यासाठी प्रथम pgcuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
* येथे मुख्यपृष्ठावर तुम्हाला नोंदणी लिंक दिसेल जिथे CUET PG 2024 registration Link असे लिहिलेले असेल.
* त्यावर क्लिक करा, एक नवीन पेज उघडेल.
* येथे स्वतःची नोंदणी करा आणि नोंदणीनंतर तुमच्या खात्यात लॉगिन करा.
* आता सबमिट वर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा. प्रिंटआउट घ्या.