'एमफिल'ला प्रवेश घेऊ नका ; युजीसीने पदवी केली कायमची बंद 

एम. फिल ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नका.

'एमफिल'ला प्रवेश घेऊ नका ; युजीसीने पदवी केली कायमची बंद 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम. फिल) अभ्यासक्रम बंद केला आहे.त्यामुळे आता एम. फिल ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नका,  असे युजीसीने स्पष्ट केले आहे. 

युजीसीने एमफिल ही पदवी बंद केली असली तरी  काही विद्यापीठे अजूनही एम.फिल साठी नवीन अर्ज मागवत आहेत, परंतु, ही पदवी बंद करण्यात आली आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एम.फिल अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत,असे निर्देशही विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा : नव्या व दूर्लक्षित अभ्यासशाखांना गवसणी घालणारे 'मराठी भाषा विद्यापीठ' : डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत

यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार " काही विद्यापीठे एम.फिल.साठी नव्याने अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना  एम.फिल.ही पदवी ही मान्यताप्राप्त पदवी नाही हे निदर्शनास आणून दिले पाहिजे. यूजीसीचे नियमन (Minimum Standards and Procedure for Award of Ph.D. Degree) विनियम २०२२ मधील क्रमांक १४ मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की उच्च शैक्षणिक संस्था एम.फिल ऑफर करणार नाहीत."