संयुक्त पेपर १ : परीक्षा केंद्रावर हुज्जत घालणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीकडून कारवाई

परीक्षेच्या दिवशी काही जिल्हा केंद्रावर मुसळधार पावसाची व पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच नवी मुंबई जिल्हा केंद्राशी संबंधित रेल्वे मार्गावर विशेषतः हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

संयुक्त पेपर १ : परीक्षा केंद्रावर हुज्जत घालणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीकडून कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) येत्या १ ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर १ ' ची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर (examination center) उशिरा येऊन केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या (quarreled with the staff ) किंवा कोणत्याही पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई (Action against the candidate) केली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील परिपत्रक नुकतेच एमपीएससीतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठाकडून एमबीएच्या परीक्षांना चार महीने उशीर; विद्यार्थी संतप्त , परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात
 
एमपीएससीतर्फे 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर १ ' या परीक्षेचे आयोजन मुंबई, पुणे ,नाशिक, अमरावती व नागपूर जिल्हा केंद्रांवर करण्यात आले आहे. परीक्षेच्या दिवशी काही जिल्हा केंद्रावर मुसळधार पावसाची व पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच नवी मुंबई जिल्हा केंद्राशी संबंधित रेल्वे मार्गावर विशेषतः हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे पाऊस, वाहतूक व्यवस्था व रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक यांची स्थिती विचारात घेऊन उमेदवारांनी उपकेंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश दिला  जाणार आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तसेच नियोजित वेळेनंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांनी जर तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधित उमेदवारांवर आयोगाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे, असेही आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.