CSEET परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध

CSEET परीक्षा ६ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.

CSEET परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध
 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI)  कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट  (CSEET)  जानेवारी २०२४ परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे  ICSI- CSEET  परीक्षेसाठी अर्ज  केलेल्या उमेदवारांना icsi.edu  या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येतील. CSEET परीक्षा ६ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. जानेवारीच्या सत्रात चार पेपर असतील. उमेदवारांना प्रश्न सोडवण्यासाठी १२० मिनिटे मिळतील. CSEET प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमात असेल. परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसेल. 

सीएसईईटी परीक्षा कोणत्याही परीक्षा केंद्रावर घेतली जाणार नाही तर रिमोट प्रोक्टोर्ड पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. उमेदवारांना परीक्षेच्या नियोजित प्रारंभाच्या 30 मिनिटे आधी पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. उमेदवार त्यांचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरून घरून किंवा कोणत्याही गैरसोयीच्या ठिकाणी CSEET परीक्षेला बसू शकतात, असे  ICSI कडून सांगण्यात आले आहे.

 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

* सर्व प्रथम, उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट द्यावी.
* मुख्यपृष्ठावरील Latest@ICSI लिंकवर क्लिक करा.
* यानंतर, ६ जानेवारी २०२४ रोजी होणार्‍या सीएसईईटीचे हॉल तिकीट डाउनलोड करा 
* यानंतर अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा
* तुमची क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉग इन करा.
* असे केल्याने, CSEET प्रवेशपत्र २०२४ डाउनलोड होईल, त्याची प्रिंट काढा.