अभ्यासासाठी मोबाईल नकोसा! ७५ टक्के विद्यार्थ्यांकडून केवळ मनोरंजनासाठीच वापर 

देशातील ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाप्रती जागरूक असून मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देत आहेत.

अभ्यासासाठी मोबाईल नकोसा! ७५ टक्के विद्यार्थ्यांकडून केवळ मनोरंजनासाठीच वापर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोरोना (Covid 19) काळात ऑनलाईन क्लाससाठी शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन (Smartphone) सहज उपलब्ध होते. ग्रामीण भागातील पालकांनी (Parents) त्यांच्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करत त्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले. मात्र ग्रामीण भारतातील (Rural India) ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी (Students) स्मार्टफोनचा वापर अभ्यासासाठी न करता केवळ मनोरंजनासाठी (Entertainment) करतात, असा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

डेव्हलपमेंट इंटेलिजेंस युनिट (DIU) ने सर्वेक्षण केले आहे. पॅन-इंडिया सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, देशातील ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाप्रती जागरूक असून मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देत आहेत. 'स्टेट ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन इन रुरल इंडिया - २०२३'  अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

व्यवस्थापन कोटा ठरतोय भ्रष्टाचाराचे कुरण? अधिष्ठाताच लाचप्रकरणी सापळ्यात अडकल्याने खळबळ

या अहवालानुसार ग्रामीण भारतातील जवळपास ४९.७ टक्के विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध आहे. पण यातील तब्बल ७६.७   टक्के विद्यार्थी प्रामुख्याने त्यांचे फोन मनोरंजनासाठी वापरतात, तर फक्त ३४ टक्के विद्यार्थी स्मार्टफोन अभ्यास-संबंधित डाउनलोडसाठी आणि ऑनलाईन क्लास साठी वापरतात. 

या सर्वेक्षणात भारतातील २० राज्यांमधील ग्रामीण भागातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, ८२ टक्के मुलींचे पालक आणि ७८ टक्के मुलांचे पालक त्यांच्या मुलांना पदवीपर्यंत आणि त्यापुढील शिक्षण देण्याची तयारी दर्शवतात.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण या विषयावरील सर्वेक्षणात असे दिसून आले कि, शाळा सोडलेल्या ५६ टक्के विद्यार्थिनींच्या पालकांपैकी ३६.८ टक्के लोकांनी मुलींना आर्थिक कारणामुळे शाळा सोडावी लागल्याचे सांगितले. या मुली गावातील छोटी मोठी कामे करून घर खर्चाला हातभार लावतात. तर ७१.८ टक्के मुलांच्या पालकांनी सांगितले कि, मुलांचे अभ्यासात रुची नसणे हेच शाळा सोडण्याचे मुख्य कारण आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo