बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार कोण ? 

जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. बहिष्कार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व नियमकांनी व शिक्षकांनी एकत्रित येऊन राज्य मंडळाच्या सचिवांना निवेदन दिले.

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार कोण ? 

इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी मुख्य नियामकांनी उत्तरपत्रिका तपासणी संदर्भातील बैठकीवर बहिष्कार घातला.त्यामुळे इंग्रजी विषयाचे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा कशाबशा घेतल्या तरी उत्तरपत्रिका तपासणीचे काय ? असा प्रश्न राज्य मंडळासमोर उभा राहणार आहे.(12th exam latest news )

जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. बहिष्कार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व नियमकांनी व शिक्षकांनी एकत्रित येऊन राज्य मंडळाच्या सचिवांना निवेदन दिले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव संतोष फाजगे यांच्यासह पुणे विभागाचे नियामक सुनील पंडीत , अमरावती विभागाचे प्रदीप मानकर, नागपूर विभागाच्या एस. एम.मोहरील, नाशिक विभागाचे एस.बी. पाटील, मुंबई विभागाचे अभिमान पाटील, कोकण विभागाचे डी.आर. वालावलकर , औरंगाबाद विभागाचे एस.एम. गांगर्डे , कोल्हापूर विभागाचे एन.बी बुराण , लातूर विभागाचे सी.डी.पांचाळ , स्मिता वर्पे आदी उपस्थित होते.