आरटीई प्रवेशाचे वाजले तीन तेरा

आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ बंद website down पडल्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही हे अनेक पालकांना समजू  शकले नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

आरटीई प्रवेशाचे वाजले तीन तेरा

RTE admission :आरटीईचे प्रवेश बुधवारी दुपारी ४ वाजता ऑनलाइन लॉटरीद्वारे दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. परंतु, दुपारपासून आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ बंद website down पडल्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही हे अनेक पालकांना समजू  शकले नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. लाखो पालक संकेतस्थळाला भेट देणार असल्याची कल्पना असूनही शिक्षण विभागाने याबाबत पूर्ण तयारी केली नसल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाचे तीन तेरा वाजल्याची चर्चा पालक व शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

 राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षण जागांची ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया बुधवारी दुपारी पूर्ण करण्यात आली. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले. परंतु, एसएमएस प्राप्त न झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशाचे काय झाले ? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परंतु संकेतस्थळ ओपन होत नसल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. तसेच या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली.
               ऑनलाइन लॉटरी द्वारे कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना प्रवेशाची एसएमएस पाठविण्यात आले?  किती विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत ?  प्रतीक्षा यादी केव्हा प्रसिद्ध केली जाणार ? याबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.