Diploma Admission : प्रवेश सुरू झाले तरी शुल्काचा घोळ, मागील वर्षीचेच शुल्क घेण्याचे आदेश

तंत्रशिक्षण संचालनालयाने दि. ४ जुलै रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवून शुल्काबाबत परवानगी मागितली होती. विभागाने नुकतीच ही परवानगी दिली आहे.

Diploma Admission : प्रवेश सुरू झाले तरी शुल्काचा घोळ, मागील वर्षीचेच शुल्क घेण्याचे आदेश
Diploma Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विनानुदानित खासगी तंत्रनिकेतने (Polytechnic)आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न संस्थांमधील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या (Diploma Courses) शिक्षण शुल्काचा (Admission Fee) घोळ अजूनही सुरूच आहे. तंत्रनिकेतन संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्य सरकारला (Maharashtra Government) जाग आली आहे. अद्यापही संस्थांची शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे शुल्क निश्चित न झाल्याने मागील वर्षीचे शुल्क तात्पुरत्या स्वरुपात घेण्याचे आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Higher and Technical Education Department) दिले आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयाने दि. ४ जुलै रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवून शुल्काबाबत परवानगी मागितली होती. विभागाने नुकतीच ही परवानगी दिली आहे. त्यानुसार पदविका अभ्यासक्रमांच्या सर्व संस्थांना २०२३-२४ वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये आकारण्यात आलेले शुल्क अंतरिम शुल्क म्हणून परवानगी देण्यात आली आहे.

Medical Admission : पहिल्या टप्प्यात केवळ एमबीबीएस, बीडीएसचेच प्रवेश...नोंदणीसाठी उरले काही तास, 'आयुष'साठी पाहा वाट

अंतरिम शुल्क हे शुल्क निश्चिती समितीच्या अंतिम शुल्काच्या मान्यतेच्या अधीन राहून असेल. शुल्क निश्चिती समितीने प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी संबंधित संस्थाना शुल्क निश्चित करून दिल्यानंतर हे शुल्क संस्थांकडून घेण्यात आलेल्या अंतरिम शुल्कापेक्षा जास्त असल्यास जास्तीचे शुल्क संबंधित संस्थांना विद्यार्थ्याकडून घेता येणार आहे.

शुल्क निश्चिती समितीने प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी संबंधित संस्थांना शुल्क निश्चित करुन दिल्यानंतर हे शुल्क संस्थांकडून घेण्यात आलेल्या अंतरिम शुल्कापेक्षा कमी असल्यास विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले जास्तीचे शुल्क संबंधित विद्यार्थ्यांना संस्थेला परत करावे लागेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत प्रवेशाच्या वेळी संबंधित विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे बंधन संस्थांना घालण्यात आले आहे.

धक्कादायक : केंद्रीय शिक्षण संस्थांमधील २० विद्यार्थी दरवर्षी करतात आत्महत्या

दरम्यान, दहावी व बारावीनंतरच्या विविध पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर झाली असून संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चितीही सुरू झाली आहे. तर काही अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून काही अभ्यासक्रमांची पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी - https://www.dtemaharashtra.gov.in/indexview.html

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD