SPPU News : परीक्षांचे निकाल लागले; विद्यापीठाची गाडी आली रूळावर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर एक ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ३१ जुलै पूर्वी सर्व परीक्षांचे निकाल लावण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर होते.

SPPU News : परीक्षांचे निकाल लागले; विद्यापीठाची गाडी आली रूळावर
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) परीक्षा विभागाने दि. १ ऑगस्ट पूर्वी बहुतांश सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक रुळावर येणार आहे. विद्यापीठाने १३९ पैकी १०१ विषयांचे निकाल जाहीर केले असून पुढील काही दिवसांत उर्वरित सर्व विषयांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. (Savitribai Phule Pune University Examination Results)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर एक ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ३१ जुलै पूर्वी सर्व परीक्षांचे निकाल लावण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर होते. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणि संलग्न महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी निकालाचे काम जलद गतीने पूर्ण केले. त्यामुळे सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेणे शक्य होणार आहे.

Medical Admission : दहा हजार जागांसाठी ४७ हजार विद्यार्थी गुणवत्ता यादीत, पाहा प्रवेशाची स्थिती

विद्यापीठातर्फे १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार होते. त्यानुसार विद्यापीठाने सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून कोरोना नंतर बिघडलेले शैक्षणिक वेळापत्रक पुन्हा रुळावर आणले आहे. या पुढील काळात सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निकाल लवकर जाहीर करून सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक समान पातळीवर आणण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

लवकरच सर्व निकाल जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षांचे निकाल दि. १ ऑगस्ट पूर्वी जाहीर केले आहेत. १३९ पैकी १०१ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पुढील काही दिवसांत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होतील. विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापकांमुळे हे शक्य झाले.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD