IIT Bombay : मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये बंदी, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

मागील आठवड्यात वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विशिष्ट जागेत मांसाहारी विद्यार्थ्यांनी बसू नये, असे पोस्टर लावण्यात आल्याचे समजते. अमुक जागी फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे.

IIT Bombay : मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये बंदी, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
IIT Bombay

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनांत झेप घेतल्या चर्चेत आलेल्या मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) ही संस्था आता वेगळ्याच कारणासाठी विद्यार्थ्यांच्या (Students) रोषास कारणीभूत ठरत आहे. संस्थेतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तिथल्या कॅंटीनमध्ये मांसाहार (Non Vegetarian) करणाऱ्या विद्यार्थ्यांना मज्जाव करण्यात आला आहे. यावरून नाराज झालेले विद्यार्थ्यांनी सध्या सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे.

मागील आठवड्यात वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विशिष्ट जागेत मांसाहारी विद्यार्थ्यांनी बसू नये, असे पोस्टर लावण्यात आल्याचे समजते. अमुक जागी फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे. इथे जर मांसाहारी विद्यार्थी भोजन करण्यास बसले, तर त्यांना तिथून उठविण्यात येईल, असे पोस्टर लावण्यात आलेले होते.

Diploma Admission : प्रवेश सुरू झाले तरी शुल्काचा घोळ, मागील वर्षीचेच शुल्क घेण्याचे आदेश

या पार्शवभूमीवर  विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात असे दिसून आले की, संस्थेच्या खानावळीच्या जेवणात नेमके काय पदार्थ असावे, याविषयीचे कोणतेही धोरण नाही. विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या निवडीवर, त्यांना वाटेल तिथे भोजनास बसण्याची परवानगी आहे. विद्यार्थी संघटनांनी ते पोस्टर  फाडून फेकले. या पोस्टरवरून सध्या संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

आयआयटीमधील विद्यार्थ्यांचे ट्विटhttps://twitter.com/AppscIITb/status/1685269133212921856?s=20

दरम्यान विद्यार्थ्यांच्या एका गटाने सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे. "खानावळीतील विशिष्ट जागेत मांसाहारी विद्यार्थ्यांनी बसू नये, हा प्रकार खरंतर विशिष्ट गटांमधील श्रेष्ठतेच्या कल्पनांना बळकटी देतो, त्याचवेळी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांशी भेदभाव कायम ठेवतो," अशा स्वरूपाची पोस्ट विद्यार्थ्यांकडून व्हायरल करण्यात येत आहे. मात्र अद्याप यावर कॉलेज प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD