शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी : ७६३ पदांसाठी मंगळवारपासून मुलाखती, पात्र उमेदवारांची यादी जाहीर

मुलाखतीसह पद भरतीमध्ये उर्वरित १९६ व्यवस्थापनांतील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी : ७६३ पदांसाठी मंगळवारपासून मुलाखती, पात्र उमेदवारांची यादी जाहीर
Teachers Recruitment in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Teachers Recruitment 2023 : शिक्षक भरतीबाबत शिक्षण विभागाने (Education Department) पात्र उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. १९६ व्यवस्थापनातील ७६३ रिक्त पदासाठी मुलाखत (Interview) व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारपासून मुलाखती सुरू होणार आहेत. एका जागेकरीता १:१० या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थासाठी मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खासगी संस्थांमधील मुलाखतीसह पदभरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात ५० हजार शिक्षकांची भरती : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६ व्यवस्थापनातील ७६३ रिक्त पदासाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा उर्वरित १९६ व्यवस्थापनांसाठी SEBC प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

आता या  १९६ व्यवस्थापनांसाठी मुलाखतीसह पदभरतीकरीता ७६३ पदांवर निवडीसाठी अध्यापन व कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. मुलाखतीसह पद भरतीमध्ये उर्वरित १९६ व्यवस्थापनांतील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेकरीता १:१० या मर्यादेत ( समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत ) उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी ७६३ पदांवर निवडीसाठी एकूण ५५३५ प्राधान्यक्रमावर उमेदवार शिफारस झाली आहे.

11th Admission : अकरावी प्रवेशाच्या नियमित फेऱ्या संपल्या, पहिली विशेष फेरी १७ जुलैपासून

मुलाखत व अध्यापन कौशल्यबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांकडून दिनांक १८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येईल. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड या ३० गुणाच्या आधारे व्यवस्थापनाकडून मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट, विषय व आरक्षण विचारात घेऊन केली जाईल. मुलाखत व अध्यापन कौशल्यातून निवड होऊन शाळेत रुजू झालेल्या उमेदवारांना शालार्थ प्रणालीमार्फत वेतन सुरु होईल, असे मांढरे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD