Diploma Admission : फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पंधरा दिवसांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. या कालावधीत नोंदणीसह संकेतस्थळावर कागदपत्रेही अपलोड करावी लागतील.

Diploma Admission : फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
D. Pharmacy Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (DTE) इयत्ता बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) पदविका अभ्यासक्रमांसाठी (Diploma Courses) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यापूर्वी ही मुदत १० जुलैपर्यंत होती.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पंधरा दिवसांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. या कालावधीत नोंदणीसह संकेतस्थळावर कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश अर्ज निश्चितीही याच कालावधीत होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार २६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

Bogus Schools : अनधिकृत शाळांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजणार; अजूनही बोगस शाळा सुरूच

गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविण्यासाठी २७ ते २९ जुलैदरम्यान मुदत देण्यात आली आहे. सुचना व हरकतींचा विचार करून ३१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. याच दिवशी प्रवर्गनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहितीही प्रसिध्द केली जाणार आहे.

पहिल्या केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना दि. १ ते ३ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. तसेच याच कालावधीत पसंतीक्रम निश्चितीही करावी लागेल. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी तात्पुरती निवड यादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD