MPSC : तीन महिन्यांत केवळ हजार पदांची शिफारस अन् शासनाकडून ८५४ पदांसाठी मागणीपत्र

आयोगाने दि. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत घेण्यात आलेल्या परीक्षा, निकाल, शासनाची मागणीपत्र, त्यानुसार केलेल्या शिफारशी आदी माहिती प्रसिध्द केली आहे.

MPSC : तीन महिन्यांत केवळ हजार पदांची शिफारस अन् शासनाकडून ८५४ पदांसाठी मागणीपत्र
MPSC Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागांकडील राजपत्रित व अराजपत्रित पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) परीक्षा घेतली जाते. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्यांच्या कालावधीत शासनाकडून (Government Recruitment) केवळ ८५४ पदांची मागणी करण्यात आली तर आयोगाने केवळ एक हजार ५१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस केली आहे. (MPSC Competitive Examinations)

आयोगाने दि. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत घेण्यात आलेल्या परीक्षा, निकाल, शासनाची मागणीपत्र, त्यानुसार केलेल्या शिफारशी आदी माहिती प्रसिध्द केली आहे. त्यानुसार या तीन महिन्यांच्या कालावधीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सर्वाधिक ५७७ विविध पदांचे मागणीपत्र देण्यात आले. त्यानंतर गृह व वैद्यकीय शिक्षण विभागाने अनुक्रमे १३९ व ११६ पदांचे मागणीपत्र दिले. असे एकूण ८५४ पदांचे मागणीपत्र आयोगाला प्राप्त झाले आहे.

Teachers Recruitment : निवृत्त शिक्षकांना अच्छे दिन; पंधरा दिवसांत भरती करण्याचे शासनाचे आदेश

तीन महिन्यांच्या कालावधीत आयोगाने ४२० पदांसाठी १७ जाहिराती प्रसिध्द केल्या. त्यात सर्वाधिक १४६ पदे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ११४ पदे विधी व न्याय विभागातील आहेत. या कालावधीत आयोगाने तब्बल ९ हजारांहून अधिक पदांसाठी पूर्व स्पर्धा परीक्षा तर ३७८ पदांसाठी मुख्य परीक्षा घेतली.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा २०२३ ही ८ हजार १६९ पदांसाठी घेण्यात आली. तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा २०२३ ही ६८१ पदांसाठी घेण्यात आली. त्याचप्रमाणे ६३ पदांसाठी चाळणी परीक्षाही घेण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणीपत्र

उच्च व तंत्रशिक्षण - ५७७

वैद्यकीय शिक्षण - ११६

जलसंपदा - ११

गृह - १३९

बृहन्मुंबई म.पालिका - ३

निबंधक भागीदारी संस्था - ८

एकूण पदे - ८५४

वैद्यकीय भरती : एका मुलीसह तीन परीक्षार्थी अन् तीन केंद्रांनी मिळून केला गैरप्रकार? विभागाकडे दिली नावे

आयोजित स्पर्धा परीक्षा

  • महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा २०२३ – ८,१६९
  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा २०२३ – ६८१
  • तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा – ३७८

एकूण पदे – ९,२२८

आयोजित चाळणी परीक्षा

  • सार्वजनिक आरोग्य – ९
  • उद्योग उर्जा व कामगार – ५४

एकूण पदे – ६३

राजपत्रित अंतिम निकाल व शिफारस झालेले उमेदवार

  • राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२१ – ४०२
  • तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा २०२१ – ३८५

एकूण शिफारस पदे – ७८७

अराजपत्रित अंतिम निकाल व शिफारस झालेले उमेदवार

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व उद्योग निरीक्षक) – १५

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट ब २०२० (राज्यकर निरीक्षक) – १

इतर परीक्षा (प्रतिक्षा यादी) – ३४

एकूण शिफारस पदे – ६०

सरळसेवा निकाल व शिफारस झालेले उमेदवार

एकूण पदे – २२५

शिफारस - २०४

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD