B. Arch. Admission : तारीख जाहीर करूनही वेळेत प्रक्रिया सुरू करण्यात सीईटी सेलला अपयश, विद्यार्थी हतबल

राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली.

B. Arch. Admission : तारीख जाहीर करूनही वेळेत प्रक्रिया सुरू करण्यात सीईटी सेलला अपयश, विद्यार्थी हतबल
B Arch Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला (CET Cell) पाच वर्षाच्या आर्किटेक्चर पदवी (B. Arch) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात अपयश आले आहे. सीईटी सेलने प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची संभाव्य तारीख १८ जुलै जाहीर केली होती. पण तीन दिवसांनंतरही ही प्रक्रिया सुरू करता आलेली नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक हतबल झाले आहेत. (Delayed admission process of B Arch)

राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. त्यामुळे लवकरच पदवीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण त्यानंतर वास्तुकला परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या नॅशनल अप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) या परीक्षेच्या निकालानंतर ही प्रक्रिया सुरू होईल, अशी चर्चा होती.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल जाहीर

‘नाटा’चा निकाल १८ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. सीईटी सेलकडून अधिकृत संकेतस्थळावर १८ जुलै ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची संभाव्य तारीख असल्याचे जाहीर केले. ही माहिती अजूनही संकेतस्थळावर झळकत आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही सीईटी सेलला ही प्रक्रिया सुरू करता आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

एका विद्यार्थ्याने सांगितले की, मी नाटाची पहिली परीक्षा दिली आहे. चांगले गुण मिळाले असल्याने सहज प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा आहे. पण अनेक दिवस होऊनही साधी नोंदणीही सुरू झालेली नाही. सेलकडून काहीच अधिकृत माहिती दिली जात नाही. काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातून तात्पुरता प्रवेश घेत आहेत. पालकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू करून मानसिक त्रास थांबवावा, अशी मागणी या विद्यार्थ्याने केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD