मराठी भाषा विद्यापीठाचा आराखडा दोन महिन्यांत; सदानंद मोरे समितीचे अध्यक्ष

राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्था पन करण्यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी होत होती. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा करण्यात आली.

मराठी भाषा विद्यापीठाचा आराखडा दोन महिन्यांत; सदानंद मोरे समितीचे अध्यक्ष
Marathi Language University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची (Marathi Language University) स्थापना केली जाणार असून त्याबाबतची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार आता या विद्यापीठाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून (Maharashtra Government) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे (Sadanand More) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीकडून दोन महिन्यांत आराखडा सादर केला जाईल. (Committee under the Chairmanship of Sadanand More to prepare the plan of Marathi Language University)

राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्था पन करण्यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी होत होती. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यावेळी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत जाहीर करण्यात आले. यापार्श्वभूमीवर समिती स्थापन करण्यात आली आहे.

NEP 2020 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुंबई, कोल्हापूरपेक्षा मागे; डॉ. नितीन करमळकर यांची खंत

समितीमध्ये सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानमंडळ मराठी भाषा समिती अध्यक्ष किंवा सदस्य, डॉ. विद्या रत्नाकर पाटील (व्यवहारे), प्रो. राजेश नाईकवाडे आणि मराठी भाषा विभागाचे सह सचिव समितीचे सदस्य असतील. तर अमरावती उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सह संचालक समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

अशी असेल समितीची कार्यकक्षा

१. मराठी भाषा विद्यापीठाचे स्थान, आवश्यक जमीन, बांधकाम- जागेची आवश्यकता, योग्यता या सर्व बाबी विचारात घेऊन शिफारस करणे.

२. विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने खर्चाचा अंदाज, अध्यापक, अध्यापकेत्तर कर्मचारी किती असावेत, राज्यावर किती आर्थिक भार पडणार आहे. यासंदर्भात तपशीलवार माहिती सादर करणे.

३. विद्यापीठाचे विविध विभाग व विद्यापीठाची सर्वसाधारण रचना याबाबतचा सविस्तर आराखडा.

४. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होतील, याबाबत शिफारस करणे.

५. पारंपारिक विद्यापीठात मराठी भाषा विभाग कार्यरत असताना, मराठी विद्यापीठ स्थापन केल्यामुळे मराठी भाषा संवर्धन करण्याकरिता गुणात्मक पडणाऱ्या फरकाची तुलनात्मक माहिती सादर करणे.

MPSC : तीन महिन्यांत केवळ हजार पदांची शिफारस अन् शासनाकडून ८५४ पदांसाठी मागणीपत्र

६. भविष्यात उच्च शिक्षण मातृभाषेतून देपणेबाबत पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणेबाबत शक्यता तपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय सारखे अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्यासाठी आवश्यक बाबी, यंत्रणा याबाबत व तद्नुषंगिक शिफारशी करणे,

७. दूरस्थ / ऑनलाईन पद्धतीने सर्व अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्याबाबत आवश्यक यंत्रणा, अडचणी व उपाय योजना याबाबतचा अभ्यास व तपशील

८. विद्यापीठाचे स्वरुप एकल असेल की, इतर महाविद्यालयांचे संलग्नीकरण असेल याबाबत सर्व बाबी विचारात घेऊन शिफारस करणे.

९. मराठीच्या सर्व बोली भाषांच्या संवर्धनासाठी विद्यापीठांतर्गत उपाययोजना

१०. इत्तर राज्यातील अन्य भाषांसाठी स्थापित विद्यापीठांच्या कामगिरीचा अभ्यास करून मराठी भाषा विद्यापीठासाठी आवश्यक बाबी आणि येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुचविणे,

११. प्रस्तावित विद्यापीठात शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम केंद्र शासनाच्या / विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने शिफारशी करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD