DYD office : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची महत्वाची कागदपत्र चोरीला ; बंड गार्डन पोलीसांकडे गुन्हा दाखल

शिक्षण उपसंचालक कार्यालयातून वैयक्तिक मान्यतेची कागदपत्र चोरीला गेली असल्याची तक्रार पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहा.शिक्षण उप- निरीक्षक अधिकारी यांनी पोलिसांकडे दिली आहे.

DYD office : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची महत्वाची कागदपत्र चोरीला ; बंड गार्डन पोलीसांकडे गुन्हा दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पूणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून (Pune Divisional Deputy Director of Education Office ) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांशी निगडीत (Related to teaching and non-teaching staff ) महत्त्वपूर्ण कागदपत्र चोरीला (An important document was stolen) गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे शिक्षकांच्या मान्यतेसह अनेक प्रश्न निर्माण होत असून कार्यालयातून कागदपत्र कोणी आणि का ? चोरली असावी, याचाही शोध घेणे गरजेचे आहे.बंड गार्डन पोलीस (Bund Garden Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : तृतीयपंथीयांना द्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश

शिक्षण उपसंचालक कार्यालयातून वैयक्तिक मान्यतेची कागदपत्र चोरीला गेली असल्याची तक्रार पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहा.शिक्षण उप- निरीक्षक अधिकारी यांनी पोलिसांकडे दिली आहे. कार्यालयातून २०१६ , २०१७, व २०१८ या वर्षातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिबीरातील मान्यतेचे जावक अभिलेखे एकूण पाच नाग आणि ३००  रुपये हे कोणीतरी चोरून नेले आहेत.

 पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहीरे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयातील रजिस्टर चोरीला गेले असल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिक्षण विभागातील काही अधिका-यांवर या पूर्वी विविध प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून त्यावर सध्या चौकशी सुरू आहे. वैयक्तिक मान्यता प्रकरणातही चौकशी केली जात आहे. त्याच संदर्भातील कागदपत्र चोरीला गेले आहेत का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच जर तीच कागदपत्र म्हणजेच पुरावे चोरीला गेले तर तपास कसा करणार ? असा प्रश्न शिक्षण विभागातील काही अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित करत आहेत.