प्राध्यापक भरतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज ; उमेदवारांची पिळवणूक , ऑनलाईन अर्जाची मागणी 

काही महाविद्यालयांकडून मुलाखतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकात आणि मोठी डिजिटल क्रांती झालेली असताना ऑफलाईन अर्ज घेण्यासाठी संस्थेतच यावे लागेल,अशी आडमुठी भूमिका शैक्षणिक संस्थेकडून घेतली जात असल्याने उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

प्राध्यापक भरतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज ; उमेदवारांची पिळवणूक , ऑनलाईन अर्जाची मागणी 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 

शासन मान्यतेने राज्यातील काही महाविद्यालयांमध्ये अनुदानित पदांची भरती (Recruitment of Granted Posts in Colleges) प्रक्रिया राबवली जात आहे.अनेक वर्षांनंतर प्राध्यापक भरती (Faculty recruitment) होत असल्याने उमेदवार अनुदानित पदावर नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, काही महाविद्यालयांकडून मुलाखतीसाठी (For interviews from colleges ) केवळ ऑफलाईन अर्ज (Offline application only) उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकात आणि मोठी डिजिटल क्रांती झालेली असताना ऑफलाईन अर्ज घेण्यासाठी संस्थेतच यावे लागेल,अशी आडमुठी भूमिका शैक्षणिक संस्थेकडून घेतली जात असल्याने उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (SHRI SWAMI VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA)
 
 राज्यातील विविध शैक्षणिक संस्था व महाविद्यालयाकडून  प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले जात आहेत.अर्जाची किंमत ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, बेरोजगार उमेदवारांसाठी ही रक्कम मोठी असल्याने अर्जाची किंमत वाजवी असावी आणि त्यात एक समानता असावी,अशी मागणी प्राध्यापक संघटनांकडून केली जात आहे. त्यात कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मिळेल. तसेच संस्थेच्या कार्यालयातून ५०० रुपायांमध्ये विकत मिळेल,असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. परंतु, केवळ अर्ज घेण्यासाठी एवढ्या दूर जाणे परवडणारे नाही. त्यामुळे संस्थेने ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने एकूण ५८ पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यात प्राचार्य पदापासून मराठी, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, संख्याशास्त्र, वाणिज्य, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, गणित, हिंदी, इतिहास,अर्थशास्त्र, भूगोल, रासायशास्त्र आदी विषयाच्या पदांचा समावेश आहे. त्यात २७ पदे खुल्या संवर्गांसाठी तर इतर पदे आरक्षित संवर्गांसाठी आहेत. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांत उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे,असेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. मात्र,अर्ज भरण्यासाठी आणि त्यानंतर मुलाखतीसाठी वाहतूक खर्च परवडणारा नाही. त्यामुळे संस्थेने ऑनलाईन अर्ज उपलब्ध करावा,अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून केली जात आहे. 

दरम्यान,संस्थेच्या कार्यालयात ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे का ? या बाबत विचारणा केली असला. केवळ ऑफलाईन अर्ज असून तो घेण्यासाठी संस्थेत यावे लागेल,असे संस्थेच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

----------------------
 
 विद्यापीठ अनुदान आयोगापासून विद्यापीठापर्यंत सर्व ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारतात. त्यामुळे राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी प्राध्यापक पदासाठी पात्र उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून द्यावा. केवळ अर्ज घेण्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातून संस्थेच्या कार्यालयात कोल्हापूरला जाणे परवडणारे नाही. लातूर, जळगाव, धुळे, गोंदिया आदी भागातील उमेदवारांना सुध्दा अर्ज करता आला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी शुल्कात कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने ऑनलाईन अर्ज भरून देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 
- संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष,  महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना,