राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ज्युनियर व सिनियर केजी सुरू करणार; दीपक केसरकरांची मोठी घोषणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ज्युनियर व सिनियर केजी सुरू करणार; दीपक केसरकरांची मोठी घोषणा
School Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास (Educational Devlopment) व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये (Schools in Maharashtra) कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (Senior KG, Junior KG) शिक्षण दिले जाणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गुरूवारी मुंबईत जाहीर केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याबाबत राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना काढले शाळेबाहेर ; राजगुरूनगर येथील प्रकार

कार्यक्रमात बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत”, असे त्यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा

परकीय भाषाही अवगत करावी

जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे आवाहन केसरकर यांनी केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo