SPPU News : विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठातर्फे घेतली जाते.

SPPU News : विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) परीक्षा विभागातर्फे (Examination Department) विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा (हिवाळी सत्र) नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता मर्यादित कालावधी उरला असून विद्यार्थ्यांनाही लवकरच परीक्षेची तयारी सुरू करावी लागणार आहे. (Savitribai Phule Pune University News)

 


पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठातर्फे घेतली जाते. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरून घेतले जातात. इंजीनियरिंग व आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विज्ञान, वाणिज्य व कला अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज पुढील दोन ते तीन दिवसात भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करण्यास हरकत नाही.

SPPU News : व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांसाठी २५ ऑक्टोबरला निवडणूक


सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून 90 दिवसानंतरच परीक्षाचे आयोजन करता येते. त्यानुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजन सुरू केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपताच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी प्राध्यापकांना दिवाळीपूर्वी आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

 

परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक म्हणतात...

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून विद्यापीठातर्फे हिवाळी सत्राच्या परीक्षा घेण्यास सुरुवात होणार आहे. काही अभ्यासक्रमांचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत उर्वरित सर्व विषयांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Following exam form has been started today

 

First Year Of B.Sc.(Hospitality Studies) 2019 Credit Pattern  

Regular - B.Sc.(Hospitality Studies) 2019 Credit Pattern 

First Year Of B.Sc. (Computer Science) 2019 Credit Pattern 

Regular - B.Sc. (Computer Science) 2019 Credit Pattern 

First Year Of B.Sc.(REGULAR) 2019 Credit Pattern 

Regular - B.Sc.(REGULAR) 2019 Credit Pattern 

First Year Of B.Sc. (Biotech) 

Regular - B.Sc. (Biotech) 

Regular - LLB(Rev.2017) 

Regular - B.A.LL.B.(Rev.2017) 

First Year Of BCA (Science) 2019 Credit Pattern 

Regular - BCA (Science) 2019 Credit Pattern 

Regular - M.Sc.Tech/M.Tech Credit Pattern 2019 

Regular - M.Sc.[Computer Science] 2019 Credit Pattern 

Regular - M.Sc. MATHEMATICS Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. PHYSICS Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. PHYSICS Credit Pattern 2020 

Regular - M.Sc. PHYSICAL CHEMISTRY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. INORGANIC CHEMISTRY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. ORGANIC CHEMISTRY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. ANALYTICAL CHEMISTRY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. BIO-CHEMISTRY 2019 Credit Pattern 

Regular - M.Sc. DRUG CHEMISTRY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. BOTANY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. ZOOLOGY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. GEOGRAPHY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. MICROBIOLOGY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. ENVIRONMENTAL SCIENCE 2019 Credit Pattern 

Regular - M.Sc. ELECTRONICS Credit Pattern 2019 

Regular - M.Sc. BIOTECHNOLOGY Credit Pattern 2019 

Regular - M.Sc.(Computer Applications) 

Regular - M.Sc.(Computer Applications)2020

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k