शिक्षणाला हवा बुस्टर डोस; २०३० चे लक्ष्य साधण्यासाठी साडे चार कोटी शिक्षकांची गरज

अहवालानुसार, २०१६ मध्ये UNESCO  ने जगभरात ६.९ दशलक्ष शिक्षकांची कमतरता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

शिक्षणाला हवा बुस्टर डोस; २०३० चे लक्ष्य साधण्यासाठी साडे चार कोटी शिक्षकांची गरज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जगात २०३० सालापर्यंत प्रत्येक व्यक्ती शिक्षित व्हावी, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जागतिक पातळीवर अजूनही ४.४ कोटी शिक्षकांची (Teachers) आवश्यकता आहे, असा अहवाल युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) सादर केला आहे. जागतिक शिक्षक दिनाचे (World Teachers Day) औचित्य साधत UNESCO ने हा अहवाल सादर केला आहे. दरम्यान, २०१६ पासून जगभरात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची संख्या वाढली आहे, तरीही पुरेसे शिक्षक नाहीत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

अहवालानुसार, २०१६ मध्ये UNESCO  ने जगभरात ६.९ दशलक्ष शिक्षकांची कमतरता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता नवीन विश्लेषणात असे आढळून आले आहे की, हा तुटवडा जवळपास एक तृतीयांशने कमी होऊन ४.४ कोटी झाला आहे. परिस्थिती सुधारली आहे, परंतु शिक्षणाच्या जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अजूनही मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता आहे.

CBSE कडून बारावीच्या अकाऊंटन्सी विषयाच्या उत्तरपत्रिकेत महत्वपूर्ण बदल

 

दरम्यान, भारतात मागील एका वर्षात शिक्षकांच्या संख्येत घट झाली असल्याचे चित्र आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशभरातील सरकारी शाळांमध्ये सुमारे ४८ लाख शिक्षकांची घट झाली आहे, तर खासगी शाळांमध्ये गेल्या वर्षी जवळपास ३५ लाख शिक्षकांची घट झाली आहे. गेल्या वर्षी एकूण शिक्षकांच्या संख्येत किमान १.९५ टक्याने घट झाली आहे.

 

युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझौले यांच्या मते, "हे क्षेत्र मोठ्या संकटातून जात आहे. जेव्हा लोक दुसरा चांगला पर्याय शोधतात तेव्हा लगेचच शिक्षकाची नोकरी सोडतात. जगातील बहुतेक देशांमध्ये शिक्षकाची नोकरी ही द्वितीय श्रेणीची मानली जाते. दोन्ही प्रकरणांमध्ये उपाय समान आहे. आपण शिक्षकांना महत्त्व दिले पाहिजे आणि चांगले प्रशिक्षण आणि चांगले समर्थन दिले पाहिजे."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k