viral video : विद्यापीठ कर्मचा-याची मुक्ताफळ ;मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून घेतले पैसे

बीए चे शिक्षण घेतलेल्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याकडून नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले असल्याचे व्हायरल झाल्या व्हिडिओतून दिसून येत आहे.आता या व्हिडिओची सत्यता विद्यापीठ प्रशासनाकडून तपासली जाणार आहेत.

viral video : विद्यापीठ कर्मचा-याची मुक्ताफळ ;मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून घेतले पैसे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचारी विद्यार्थ्यांकडून (employee of Savitribai Phule Pune University exam department ) मार्कशीट (marksheet)व इतर कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला.या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.विद्यापीठातील कर्मचारी संबंधित विद्यार्थ्यांनेच मला पैसे (money) दिले,अशी कबुलीही देत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा परीक्षा विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठातील 'जी २०' खर्चाची काढणार श्वेतपत्रिका ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधून उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात यावे लागते.परंतु,परीक्षा विभागातील काही कर्मचारी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता.एका विद्यार्थ्याने तर माझ्याकडून कागदपत्रांसाठी पैसे मागितले असल्याची लेखी तक्रार स्टॅम्प पेपर लिहून दिली होती.मात्र ,संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.आता एका कर्मचाऱ्याला मार्कशीटसाठी तीन हजार रुपये घेताना विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच पकडून दिले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षा विभागातील कर्मचारी पैसे घेत असल्याचा पुरावाच तयार केला आहे. बीए चे शिक्षण घेतलेल्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याकडून नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले असल्याचे व्हायरल झाल्या व्हिडिओतून दिसून येत आहे.आता या व्हिडिओची सत्यता विद्यापीठ प्रशासनाकडून तपासली जाणार आहेत.
------------------
 विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्या विरोधातील तक्रार व व्हायरल  झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. 
- डॉ प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ