स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या भरतीसाठी पात्रतेत बदल करण्याची मागणी

जलसंपदा विभागाकडून ४ हजार ४९७ पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या जवळपास दीड हजार जागा आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या भरतीसाठी पात्रतेत बदल करण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जलसंपदा विभागामार्फत (Water Resources Department) गट ब व गट क पदे भरण्यासाठी जाहिरातीत इतर पदांसोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट क) (Civil Engineering Assistant) संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी केवळ सिव्हीलमधील पदवी किंवा पदविका अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून घोषित केलेले बांधकाम पर्यवेक्षक किंवा आर्किटेक्चर ड्राफ्टसमन पाठ्यक्रम उत्तीर्ण उमेदवारांनाही पात्र करण्याची मागणी केली जात आहे.

 

जलसंपदा विभागाकडून ४ हजार ४९७ पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या जवळपास दीड हजार जागा आहे. या पदासाठी शासनाकडून किंवा शासनमान्य मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारा किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून घोषित केलेले बांधकाम पर्यवेक्षक किंवा आर्किटेक्चर ड्राफ्टसमन पाठ्यक्रम उत्तीर्ण अशा विविध अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना पात्र करण्यात आलेले नाही.

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणानंतर बनारस हिंदू विद्यापीठाचे होणार विभाजन

 

जिल्हा परिषद, महानगरपालिका, लघु-पाठबंधारे विभाग अशा कितीतरी विभागांमध्ये सिव्हिल पदवी, पदविका धारक पात्र आहेतच. परंतु शासनमान्य मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारा किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून घोषित केलेले बांधकाम पर्यवेक्षक किंवा आर्किटेक्चर ड्राफ्टसमन पाठ्यक्रम उत्तीर्ण अशा विविध अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनाही पात्र करण्यात आलेले आहे.

 

जलसंपदा विभागाने सात-आठ वर्षानंतर इतकी मोठी जाहिरात काढली आहे. पण तत्सम अभ्यासक्रम केलेले हजारो उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी अर्जच करू शकणार नाहीत. इतर विभागांमध्ये तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत. पण जलसंपदा विभागात नाहीत, हा दुजाभाव दूर करून सेवाप्रवेश नियमात योग्य तो बदल करून सर्व उमेदवारांना पात्र करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO